कुरमुरे कसे बनवले जातात? फॅक्टरीतील व्हिडीओ पाहून तुम्ही भेळ खाणंच सोडाल, पाहा

Viral Video: कुरमुरे बनवण्याचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. फॅक्ट्रीतील हा व्हिडिओ एकदा पाहाच. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 7, 2023, 01:47 PM IST
कुरमुरे कसे बनवले जातात? फॅक्टरीतील व्हिडीओ पाहून तुम्ही भेळ खाणंच सोडाल, पाहा title=
This Is How Puffed Rice Are Made In Factory you will not eat bhel

Viral Video: कुरमुऱ्याचा चिवडा असो किंवा भेळ प्रत्येकाच्याच आवडीचे आहे. अनेकांना फक्त कुरमुरे खाणंही आवडतं. भेळीसाठी कुरमुरे वापरले जातात. वजन कमी करण्यासाठीही कुरमुरे खाल्ले जातात. तर मुंबईच्या चौपाटीवर मिळणारी भेळ ही तर खूपच लोकप्रिय आहे. कांदा, टॉमेटो, आंबट-गोड चटणी आणि काही मसाले वापरुन बनवली जाणारी चटपटीत भेळ सगळ्यांच्याच आवडीची आहे. पण जे कुरमुरे तुम्ही इतक्या मिटक्या मारत खाता ते कसे बनवले जातात हे तुम्हाला माहित्येय का? सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा पाहिल्यानंतर तुम्हीही भेळ खाणं सोडून द्याल. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओमुळं काही जणांचा संतापही होऊ शकतो. इन्स्टाग्रामवर foodie_incarnate नावाच्या एका पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर कॅप्शनमध्ये लिहण्यात आले आहे की, कुरमुरे बनवण्याची धक्कादायक प्रक्रिया. भेलपुरी आवडणाऱ्या व्यक्तीला टॅग करा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती पायाने भात तुडवत आहे. त्यानंतरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःच कळेल की कुरमुरे बनवण्यासाठी किती गलिच्छ पद्धत वापरली जाते. जे पाहून तुमचाही मुड खराब होऊ शकतो. 

व्हिडिओत एक व्यक्ती अक्षरशाः पायाने तांदुळ तुटवताना दिसत आहे. त्यांच्या अंगावरील कपडेही ओले झालेले दिसत आहेत. तर, एका हौदातील पाण्यात तो उभा असून त्यातूनच तांदूळ भिजवलेले काढत आहेत. तसंच, फॅक्टरीत काम करणाऱ्या एकाही कर्मचाऱ्याच्या हातात ग्लोव्हस दिसत नाहीयेत. त्याचबरोबर कुरमुरे बनवून झाल्यानंतर ते तसेच जमिनीवर टाकण्यात आले आहेत. व एका बादलीच्या सहाय्याने पोत्यात भरण्यात येत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ खूप जुना असून तो आता चर्चेत आला आहे. 18 जुलै रोजी हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत 16 लाखाहून अधिक जणांनी त्यावर लाइक केले आहे. लोकांनी व्हिडिओवर अनेक रिअॅक्शन देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, या चॅनेलमुळं माझ्या आवडीच्या सर्व गोष्टी खाण्यापासून मला परावृत्त करण्याबाबत मी त्यांना धन्यवाद गेत आहे. तर, एकाने म्हटलं आहे की, यात काहीही चुकीचं नाहीये. आजपर्यंत कोणाचा भेळ खाऊन मृत्यू झालाय का? तर एकीने म्हटलं आहे की, तरीदेखील मी भेळ खाणार आहे.