मुंबई : लखीमपुर खीरी जिल्ह्यातील मैलानी क्षेत्राचं एक गावं स्वतंत्र्यता दिवस साजरा करत नाही.
आझादीचे ७० वर्ष पूर्ण होऊन देखील हे गावं ओळखू शकलेलं नाही की आनंद साजरा करायचा तर कसला करायचा? मूलभूत सुविधा देखील नसल्यामुळे मैलानीच्या चौधीपुर गावातील लोकांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. लखीमपुर खीरी जिल्ह्यापासून जवळपास ७० किमी दूर चौधीपुर गावात कोणताच विकास झालेला नाही. महत्वाची बाब म्हणजे या गावांत अद्याप वीज नाही त्याचप्रमाणे या गावाला इतर गावांशी जोडणारा कोणताही पक्का रस्ता नाही. गावातील लोकं अजूनही उघड्यावर शौचाला जातात. दक्षिणी खीरी वन विभागातील मैलानी जिल्ह्यातील हा सर्वात उपेक्षित क्षेत्र आहे. चौधीपुरमध्ये सर्वात जास्त गरिबी आहे. इथे राहणारे अधिक लोकं हे आदिवासी जातीचे असल्यामुळे ते जास्त प्रमाणात जंगलावर अवलंबून आहेत. यांना कधीच कोणत्याच विकास कामात सहभागी करून घेतले नाही. इथे जवळपास ८० कुटुंब राहतात. आणि फक्त चार शौचालय आहेत. आणि महत्वाचं म्हणजे वीज इतर शेजारच्या गावांत आहे मात्र या चौधीपुर गावात मात्र अद्याप कोणतीही वीज पोहचू शकलेली नाही.
तेथील एका गावकऱ्याने सांगितले की, आम्हाला गावांत असणाऱ्या मूलभूत सुविधा देखील नाहीत. आम्ही जंगलातील जानवरांच्या हल्ल्याचे कायम शिकार होत असतो. आमच्या महिला सरकारी शौचालयाची वाट पाहत आहेत. तसेच रस्ते इतके खराब आहेत की कुणीही गावात येण्यास उत्सुक नाही.
तेथील दुसऱ्या व्यक्तीने सांगितले की, आज स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. आमच्या जीवनात थोडा देखील बदल झालेला नाही. आम्ही त्याच गरिबीत जगत आहोत. मग या स्वातंत्र्याचा आम्हाला काय फायदा? आमच्या मूलभूत सुविधाचं जर पूर्ण होत नसतील तर हा उत्सव साजरा करण्यात काय अर्थ आहे.