Budget 2021: दशकातील पहिलं बजेट देशासाठी महत्त्वपूर्ण - मोदी

आज संसदेचं अर्थसमकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.  

Updated: Jan 29, 2021, 12:41 PM IST
Budget 2021: दशकातील पहिलं बजेट देशासाठी महत्त्वपूर्ण - मोदी title=

नवी दिली : कोरोना माहामारीनंतर पहिल्यांदा देशाचं आर्थिक बजेट 1 फब्रुवारी रोजी सादर होणार आहे. आज संसदेचं अर्थसमकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन्ही सभागृहांच्या खासदारांना संबोधित केलं. शिवाय या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, गृहमंत्री अमित शहा संसदेत उपस्थित झाले आहेत.

महत्त्वाचं म्हणजे अधिवेशनाला सुरूवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यमांशी संवाद साधला. 'दशकातील पहिला बजेट देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वतंत्र्यसैनिकांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे.' असं मोदी म्हणाले. 

त्याचप्रमाणे, भारताच्या इतिहासात 2020 साली अर्थमंत्र्यांना 4-5 मिनी बजेट सादर करावे लागले होते. यंदाच्या अर्थसंकल्पाकडे देखील ४-५ मिनी बजेटचा एक भाग म्हणून पाहावं लागेल.' असं सुद्धा पंतंप्रधान मोदींनी सांगितलं.  

सरकार सर्व मुद्द्यांवर या सत्रात चर्चा करणार आहे. मला विश्वास आहे की नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपण आपलं योगदान देण्यात मागे राहणार नाही' अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.