'दारू पिणारे खोटं बोलत नाहीत'; कोणी केलाय हा अजब दावा, वाचा

Viral News: मध्य प्रदेशच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने कोविड लसीकरणाबाबत अजब विधान केले आहे. दारू विकत घेणाऱ्यांची केवळ तोंडी खातरजमा करणे पुरेसे असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. 

Updated: Nov 19, 2021, 09:13 AM IST
'दारू पिणारे खोटं बोलत नाहीत'; कोणी केलाय हा अजब दावा, वाचा title=

भोपाल : मध्य प्रदेशातील खंडवा येथील उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने 'दारू पिणारे खोटे बोलत नाहीत' असा दावा करणारे अजब विधान केले आहे. गुरुवारी पत्रकारांशी बोलताना जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी आर.पी. किरार यांनी दावा केला की, मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी लसीच्या (COVID-19 लस) दोन्ही डोस केल्याची तोंडी खात्री पुरेशी आहे. मध्य प्रदेशच्या खंडवा प्रशासनाने जिल्ह्यातील ग्राहकांना मद्य खरेदी करण्यासाठी लसीकरण अनिवार्य केले आहे.

कोविड लसीबाबत अधिकाऱ्याचे अजब विधान

मध्य प्रदेशातील खंडवा येथील जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्याने बुधवारी एक आदेश जारी करून मद्यविक्रीच्या दुकानांना केवळ कोविड-19 लसीचे दोन्ही डोस मिळालेल्यांनाच मद्यविक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.

17 नोव्हेंबरच्या आदेशात जिल्हा प्रशासनाकडून सध्या सुरू असलेल्या 'लसीकरण महाअभियान' अंतर्गत प्रत्येक रहिवाशाचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

यामुळे उत्पादन शुल्क अधिकारी किरार यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कोविड लसीचे दोन्ही डोस मिळालेल्या लोकांनाच दारूच्या दुकानात दारूची विक्री केली जाईल. याबाबत ग्राहकांना तोंडी विचारणा केली जात असून फलकही लावले जात आहेत.

अधिकाऱ्यांचे अजब विधान

मद्य खरेदी करणाऱ्यांची लसीकरणाची पडताळणी प्रक्रिया काय असेल असे विचारले असता किरार म्हणाले की, "हे ग्राहकांच्या प्रामाणिकपणावर अवलंबून आहे." जर त्याने सांगितले की त्याने लसीकरण पूर्ण केले आहे, तर ते पुरेसे आहे.

माझ्या अनुभवानुसार, मद्यपान करणारे लोकं खोटं बोलत नाहीत. त्यासाठी लसीकरणाचा पुरावा आवश्यक नाही.

मध्य प्रदेशात 7.80 कोटी लसीचे डोस

भारत सरकारच्या वेबसाइटनुसार, 18 नोव्हेंबरपर्यंत मध्य प्रदेशात 7,80,80,750 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी 5,04,61,867 जणांना त्यांचा पहिला डोस तर 2,76,18,883 जणांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

Madhya Pradesh, Khandwa, Liquor Sale, Madhya Pradesh Official, Vaccination, Liquor,