जगातील दारुच्या टॉप १० ब्रँड्समध्ये भारतातील तीन ब्रँड्स

भारतातील दारुच्या ब्रँड्सना जगभरात पसंती मिळतेय. यामुळेच जगातील दारुच्या टॉप १० ब्रँड्समध्ये भारतातील तीन ब्राँड्सचा समावेश आहे. भारतातील ब्राँड ऑफिसर्स चॉईस जगात दुसऱ्या नंबरचा ब्राँड आहे.

Updated: Jul 13, 2017, 09:33 PM IST
जगातील दारुच्या टॉप १० ब्रँड्समध्ये भारतातील तीन ब्रँड्स title=

नवी दिल्ली : भारतातील दारुच्या ब्रँड्सना जगभरात पसंती मिळतेय. यामुळेच जगातील दारुच्या टॉप १० ब्रँड्समध्ये भारतातील तीन ब्राँड्सचा समावेश आहे. भारतातील ब्राँड ऑफिसर्स चॉईस जगात दुसऱ्या नंबरचा ब्राँड आहे.

इंटरनॅशनल वाईन अँड स्प्रिंट रिसर्चच्या रिपोर्टनुसार, मॅकडॉल्स व्हिस्की ६व्या नंबरवर आहे. तर इंपेरियल ब्लू १०व्या स्थानी आहे. जगातील १०० टॉप ब्राँड्समध्ये भारतातील १६ ब्राँडसचा समावेश आहे. 

भारतात नोटाबंदी तसेच बिहारसह अनेक ठिकाणी दारुबंदी असतानाही ऑफिसर्स चॉईस जगात दुसऱ्या नंबरवर आहे. टॉप ब्राँड्समधील पहिल्या स्थानावर जिनरो ब्राँड आहे. दुसऱ्या स्थानी ऑफिसर्स चॉईस, तिसऱ्या स्थानावर राँग काओ. चौथ्या स्थानावर अँम्पेरॅडोर, पाचव्या स्थानावर चुरुम चुरुम, सहाव्या स्थानावर मॅकडॉल्स आहे.