आधी पत्नीला संपवले मग न्याय मागायला गेला; 17 वर्षांनंतर स्वतःच्याच जाळ्यात असा अडकला

Kerla Husband Murder Wife: गुन्हेगाराने कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी एकना एक दिवस त्याचा गुन्हा उघडकीस येतोच. इथे मात्र आपल्याच जाळ्यात एक आरोपी अडकला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 21, 2023, 05:39 PM IST
आधी पत्नीला संपवले मग न्याय मागायला गेला; 17 वर्षांनंतर स्वतःच्याच जाळ्यात असा अडकला title=
TN worker blamed for Kerala woman's murder 17 yrs ago

Kerla Husband Murder Wife: पत्नीच्या मृत्यूनंतर तो कित्येक दिवस अस्वस्थ होता. पत्नीच्या हत्येनंतर अनेक वर्ष त्याने कोर्ट-कचेरी केली. तिला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या. नातेवाईक, शेजाऱ्यांनी त्याला दिलासा दिला. वर्ष उलटले तरीही पत्नीच्या मारेकऱ्याचा शोध लागला नाही. बघता बघता 17 वर्षे झाली तरीही हत्येचा उलगडा झाला नाही. पत्नीचे मारेकरी लवकरच सापडतील अशी त्याला आशा होती. मात्र एकदिवस असं काही घडलं की पतीच तुरुंगात गेला. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी घटना केरळमध्ये घडली आहे. 

केरळातील पुलदा गावातील 50 वर्षांच्या रमा देवी या त्यांचा पती जनार्दन नायरसोबत राहत होती. दोघेही उच्च शिक्षित होते. मात्र एकदिवस रमादेवी घरात एकट्याच असताना एक व्यक्ती घरास घुसला आणि त्यांची हत्या केली. त्यानंतर पोलिस आले तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणाचा तपासही सुरु करण्यात आला. तेव्हा गावात राहणाऱ्या एका मजूरावर हत्येचा संशय घेण्यात आला. 

रमादेवी यांच्या हत्येनंतर तो मजूर तिथून फरार झाला होता. तो मजूर मूळचा बिहार येथला होता. तो फरार झाल्यानंतर पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्याचा शोधही घेण्यात आला मात्र त्याचा काहीच पत्ता लागला नाही. या केसची परिसरात अनेक वर्ष चर्चा होती. 

जनार्दन नायर पोस्टाचे निवृत्त अधिकारी होते. परिसरात त्यांचे खूप नाव होते. रमादेवींना न्याय देण्यासाठी त्यांनी आंदोलनही छेडले होते. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. कालांतराने केस बंद झाली. मात्र रमादेवी यांचे पती जनार्दन यांनी केसच्या खोलात जायचे ठरवलेच होते. काहीही करुन पत्नीच्या मारेकऱ्याला शिक्षा करायचे हे त्यांनी ठरवले होते. 2007 रोजी जनार्दन नायरने उच्च न्यायालयात केस रिओपन करण्यात यावी अशी याचिका दाखल केली. एक विशेष पथक तयार करुन पत्नीच्या हत्येचा पुन्हा तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

पोलिसांनी या केसचा पुन्हा नव्याने तपास करण्यात  आला. मात्र आता 17 वर्षांनंतर खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. रमादेवी यांची हत्या करण्यात आली होती तेव्हा त्याच्या हातात गुन्हेगाराचे केस होते. रमादेवी यांचा आरोपी हा दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचाच पती निघाला. घटनेच्या दिवशी रमादेवी जेव्हा घरात एकट्याच होत्या तेव्हा जनार्दन गुपचुप घरात घुसला आणि त्याने रमादेवीची हत्या केली. त्याचवेळी झटापटीत रमादेवीच्या हातात जनार्दन नायरचे केस आले होते. 

पोलिसांनी त्यावेळी योग्य तपास न केल्याने या गोष्टीचा उलगडा झाला नाही. मजूरानेच हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना होता त्यामुळं त्यांनी त्याचदृष्टीने हत्येचा तपास केला. पोलिसांनी फॉरेंन्सिक रिपोर्टदेखील तपासले नाहीत. याच गोष्टीचा फायदा  जनार्दन नायरने घेतला. त्यांचा मजूराच्या डोक्यावर हत्येचा आरोप टाकला. 

लोकांना खरं वाटावं आणि सहानुभूती मिळावी यासाठी त्याने कोर्टात न्याय मागण्याचे नाटक केले मात्र तेच नाटक आता त्याच्या अंगलट आले. 17 वर्षांनंतर पोलिसांनी क्राइम सीन क्रिएट केला त्याचवेळी जनार्दनने दिलेल्या जबाबावरुन पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्यांनी रमादेवीच्या हातात सापडलेल्या केसांची आणि जनार्दनचे अहवाल तपासून पाहिले आणि सत्य समोर आले. जनार्दन नायर त्यांनेच टाकलेल्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी जनार्दनला अटक केली आहे.