लसीकरण नोंदणीसाठी फक्त याच लिंकवर क्लिक करा… नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते

पीआयबी फॅक्ट चेकच्या पथकाने याचा तपास केला आणि त्याबद्दलचा खुलासा केला आहे.

Updated: May 8, 2021, 04:09 PM IST
लसीकरण नोंदणीसाठी फक्त याच लिंकवर क्लिक करा… नाहीतर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते

मुंबई : देशात कोरोना संसर्गाची दुसर्‍या लाट सध्या सुरु आहे आणि लवकरच तिसरी लाटही भारतात हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण्याच्या प्रक्रियाला वेग आला आहे. 1 मेपासून, देशातील बर्‍याच राज्यात, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना लस दिली जात आहे. या कोरोना काळात अनेक प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करुन लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी सांगण्यात येत आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या पथकाने याचा तपास केला आणि त्याबद्दलचा खुलासा केला आहे.

सत्य काय ?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मॅसेजमध्ये, 18+ लोकांना दिलेल्या लिंकवर नोंदणी करण्यास सांगितले जात आहे. पीआयबी फॅक्ट चेक टीमने त्याला फेक लिंक म्हणून घोषीत केले आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने ट्वीट करून असे लिहिले आहे की, "एका संदेशामध्ये असा दावा केला जात आहे की, 18 वर्षापेक्षा जास्त वयाचे सर्व लोकं दिलेल्या लिंकद्वारे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून कोरोना विषाणूच्या लसीकरणासाठी नोंदणी करू शकतात. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हा बनावट आढळला आहे. त्यामुळे लोकांनी लसीकरण नोंदणीसाठी http://cowin.gov.in या सरकारी वेबसाइटला भेट द्या.

लसीसाठी कुठे नोंदणी करावी

18+ वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यासाठी कोव्हिन पोर्टल, आरोग्य सेतु किंवा उमंग अ‍ॅपद्वारे नोंदणी करणे बंधनकारक आहे. 18+ वयोगटातील लोकांना लसीकरण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारी रुग्णालयांव्यतिरिक्त आपण खाजगी लसीकरण केंद्रांवरही लसी घेऊ शकता.

नोंदणी दरम्यानच, आपल्याला खाजगी आणि सरकारी दोन्ही लसीकरण केंद्रांची निवड करण्याचा पर्याय मिळेल. आपल्या सोयीनुसार केंद्र निवडून आपण लस घेऊ शकता. खाजगी केंद्रावर आपल्याला लसीचे शुल्क भरावे लागेल, तर सरकारी केंद्रात ते विनामुल्य मिळत आहे.

आतापर्यंत देशात 16.49 कोटी डोस तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये 3.28 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी देशभरात 23.70 लाख डोस देण्यात आले आहेत.