RBI ची तुमच्यावर नजर; 2 हजारांची नोट बदलण्याची आज अंतिम तारीख, अन्यथा....

RBI Rules : 2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी आज शेवटचा दिवस

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 7, 2023, 09:58 AM IST
RBI ची तुमच्यावर नजर; 2 हजारांची नोट बदलण्याची आज अंतिम तारीख, अन्यथा.... title=

 2000 Notes Exchange Or Deposit Deadline : आज म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 रोजी 2 हजारांच्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही अजून दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या नसतील तर आज तुमची शेवटची संधी आहे. कारण आजनंतर तुम्ही बँकेत 2000 रुपयांच्या नोटा जमा आणि बदलू शकणार नाही. रण 2,000 रुपयांच्या नोटा फक्त 7 ऑक्टोबर 2023 पर्यंतच बँकांमध्ये बदलून आणि जमा करता येतील. मात्र, यानंतर म्हणजेच शनिवारनंतर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या देशभरातील 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकाल. ज्यांना तिथे पोहोचता येत नाही ते पोस्टाद्वारेही नोटा बदलून घेऊ शकतील.

12,000 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात शिल्लक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार 3.43 लाख कोटी रुपये म्हणजेच 2000 रुपयांच्या 96 टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. त्यापैकी ८७ टक्के रक्कम बँक खात्यात जमा झाली आहे. तर 13 टक्के नोटा लहान मूल्याच्या नोटांसह बदलण्यात आल्या आहेत. आरबीआयने म्हटले आहे की 3.37 टक्के म्हणजेच 12,000 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही बाजारात आहेत.

नोटा बदलून घेण्याची शेवटची तारीख

यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित केली होती. पण RBI ने 2000 रुपयांच्या नोटा बदलून बँकांमध्ये जमा करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवली होती. रिझर्व्ह बँकेने या वर्षी 19 मे रोजी 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. यानंतर लोकांनी बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा आणि बदलण्यास सुरुवात केली. मात्र काही लोकांनी अद्याप बँकांमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा जमा केलेल्या नाहीत.

2000 रुपयांच्या नोटा वैध राहतील

आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात 7 ऑक्टोबरनंतरही 2000 रुपयांच्या नोटा वैध राहतील, असे म्हटले आहे. RBI ने म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा न्यायालये, कायदा अंमलबजावणी संस्था, सरकारी विभाग किंवा सार्वजनिक प्राधिकरणांना तपास किंवा कार्यवाही दरम्यान आवश्यक असेल तेव्हा ते कोणत्याही मर्यादेशिवाय RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा करू शकतील.