चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर

Updated: Mar 18, 2021, 07:40 AM IST
चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सोन्या-चांदीचे आजचे दर  title=

मुंबई : पेट्रोल डीझेलच्या किंमतीप्रमाणे सोन्या चांदीचे (Gold Silver Rate) दर हा सर्वसामान्यांसाठी महत्वाचा भाग असतो. सर्वसामान्य जनता दररोज सोनं खरेदी करत नसली तरी मंगल कार्यासाठी सोनं शुभ मानलं जातं. सोन्यातली गुंतवणूक ही भविष्य काळासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे महागाई असली तरी सोन्या चांदीच्या दर पाहून शक्य होईल तशी खरेदी केली जाते. 

काल 22 कॅरेट सोन्याची किंमत (Today Gold Price) प्रति 10 ग्रॅम 44 हजार 150 इतकी होती. आज त्यामध्ये कोणताही बदल झाला नाहीय. तसेच 24 कॅरेट सोन्याची किंमत काल 48 हजार 160 इतकी होती. ही किंमतही आज स्थिर पाहायला मिळतेय. 

चांदीच्या  (Today Silver Price) बाबतीत बोलायचं झालं तर 1 किलोग्रॅम चांदीचा दर काल 67 हजार 600  इतका होता. आज हा दर 600 रुपयांनी कमी झाला आहे. आज 1 किलोग्रॅम चांदीची किंमत 67 हजार इतकी आहे. चेन्नई आणि हैदराबाद वगळता सर्व शहरांत ही किंमत पाहायला मिळते. चेन्नई आणि हैदराबाद येथे चांदीची किंमत 71 हजार 600 इतकी आहे.

सोन्याचे दर कमी होत असल्यामुळे सोने या धातूसाठी मागणी वाढली आहे. शिवाय लग्न सराई असल्यामुळे सोन्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. शिवाय सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

दरात घसरण

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरांत सतत चढ-उतार होत आहे. कोरोना काळात जवळपास 60 हजार रूपायांच्या घरात पोहोचले होते. पण अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी देशाचं आर्थिक बजेट सादर केल्यानंतर सोन्याचे दर कमी झाले होते. त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. आज सोन्याचे दर स्थिर आहेत.