आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर

Updated: May 15, 2021, 09:29 AM IST
आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या  title=

नवी दिल्ली :  सरकारी तेल कंपन्यांनी एक दिवसाच्या वाढीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती आज स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींत सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. याआधी शुक्रवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 28 ते 29 पैसे आणि डिझेलच्या किंमती 34 ते 35 पैसे प्रतिलिटर वाढ झाली.

तेल विपणन कंपन्यांनी मे महिन्यात आत्तापर्यंत 8 वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. या महिन्यात दोन्ही इंधनाचे दर वाढले आहेत. देशातील बर्‍याच भागात पेट्रोलची किंमत 100 रुपयांवर पोहोचली आहे किंवा त्याच्या जवळपास आहे.

इंडियन ऑईलच्या (Indian Oil) वेबसाईटनुसार (Price for 1 liter today Petrol and Diesel in Metros), राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (Delhi) आज एक लिटर पेट्रोलची किंमत 92.34 (Petrol Price today in Delhi) तर डिझेलची किंमत 82.95 रुपये आहे. 

त्याचप्रमाणे मुंबई (Mumbai)मधील पेट्रोल (Petrol price in Mumbai) 98.65 रुपये आणि डिझेल90.11  रुपये आहे. 

कोलकातामध्ये पेट्रोल 92.44 रुपये आणि डिझेल 85.79 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल  94.09(Petrol Diesel Price Today)आणि डिझेल जल 87.81 रुपये आहे. 

त्याच वेळी नोएडामध्ये पेट्रोलची किंमत आज येथे प्रतिलिटर 90.27 रुपये आहे.