Delhi Metro मध्ये पुन्हा कपलचे अश्लील चाळे, दरवाज्याजवळ Kiss करतानाचा Video Viral

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो ही गेल्या काही महिन्यांपासून वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध झाली आहे. दिल्ली मेट्रोमधील कपलचे अश्लील चाळे काही केल्या थांबत नाही आहे. सार्वजनिक ठिकाणी जनची लाज न बाळगता कपल खुल्लमखुल्ला एकमेकांना KISS करताना दिसून आले.

नेहा चौधरी | Updated: Jul 30, 2023, 08:49 AM IST
Delhi Metro मध्ये पुन्हा कपलचे अश्लील चाळे, दरवाज्याजवळ Kiss करतानाचा Video Viral title=
today Trending News Couple Kissing in Delhi Metro Again video viral on Social media google Trending Video now

Couple Kissing in Delhi Metro Again : दिल्ली मेट्रो ही दिल्लीकरांच्या रोजचा प्रवासाचं आरामदायी साधन आहे. मात्र ही दिल्ली मेट्रो सोशल मीडियावर वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध झाली आहे. दिल्ली मेट्रोचे व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मेट्रोमध्ये तरुणीचा डान्स, तर कधी गाणं गाणारी तरुण मंडळी यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. मात्र दिल्ली मेट्रोमधील कपलचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओंमुळे दिल्ली मेट्रोच्या प्रतिष्ठेला दाग लागला आहे. वारंवार दिल्ली मेट्रो प्रशासनाकडून इशारा देऊनही कपलचे सार्वजनिक ठिकाणी प्रवासादरम्यान अश्लील चाळे करणं काही थांबत नाही आहे. (today Trending News Couple Kissing in Delhi Metro Again video viral on Social media google Trending Video now)

काही महिन्यांपूर्वी दिल्ली मेट्रोमधील बिकिनी घातलेल्या तरुणीचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर तर दिल्ली मेट्रोमधील अनेक धक्कादायक आणि आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आलेत. ज्यामध्ये कपल एकमेकांना किस करताना दिसले. तर एका व्हिडीओमध्ये तरुणीच्या शेजारी बसून एका व्यक्तीचा हस्तमैथून करतानाचा व्हिडीओने दिल्ली महिला आयोगालाही धक्का बसला. त्यानंतर दोन तरुणांचा अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओने तर सगळ्यांची झोपच उडवली. 

मनाची नाही तर जनाची लाज बाळगा!

मनाची नाही तर जनाची लाज बाळगा, असं वारंवार सांगूनही कपलचे दिल्ली मेट्रोमध्ये प्रवास करताचा रोमान्स काही केल्या थांबत नाही आहे. दिल्ली मेट्रो प्रशासन असो किंवा दिल्ली महिला आयोग असो अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देऊनही या लोकांना कोणाचीही पर्वा नाही असंच दिसतं. 

प्रेम आंधळ आणि वेडं असतं असं म्हणतात. म्हणून काय झालं सार्वजनिक ठिकाणी महिला, ज्येष्ठ व्यक्ती अगदी लहान मुलं असतात. दिल्ली मेट्रोमध्येही तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता एक ज्येष्ठ महिला बसली आहे. तिच्या शेजारीच उभं राहून कपल एकमेकांच्या मिठीत किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर delhihub09 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Delhi hub09 (@delhihub09)

या व्हिडीओ कंमेट्स बॉक्समध्येही यूजर्सकडून आक्षेपार्ह आणि घाणेरडे कमेंट्स पडत आहे. या व्हिडीओमधील तरुणीच्या घरच्यांना हे जर कळलं तर काय होईल याची कल्पनाही करवतं नाही.