मुंबई : आपल्यापैकी जवळ-जवळ सर्वच लोकांना वाहतुकीचे नियम माहितच असतील. आपण त्यांपैकी एक जरी नियम मोडले तर ट्राफिक पोलिस आपलंच चलान कापतात. तर काही केसमध्ये वाहन चालकाचं लायसन्स देखील रद्द होऊ शकतं. खरंतर सगळे लोक ट्राफिकचे सर्व नियम पाळतात की, नाही हे पाहण्यासाठी बऱ्याच
ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी देखील लावली जाते.
यामध्ये हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, ट्रिपलिंग राईड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय जर कोणताही वाहन चालक ट्राफिक पोलिसांच्या हाती लागला, तर त्यांना चलान भरावा लागणार हे निश्चित. परंतु पोलिसच जर वाहतुकीचे नियम पाळत नसतील तर?
सध्या सोशल मीडियावर वाहतुक पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून लोकांनी त्या व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली आहे.
खरंतर पोलिसांचा हा व्हिडीओ पटनामधील आहे. येथे एका दुचाकीवर तिन पोलिस बसलेले आहेत. एवढेच काय तर त्यांनी हेल्मेटही घातलेला नाहीय. म्हणजे खुद्दं वाहतुक पोलिसांनी ट्रिपल सिट गाडी चालवली आहे, शिवाय हेल्मेटचा देखील नियम मोडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तीन पोलिस दुचाकीवरून कुठेतरी जात आहेत, तेव्हा एका महिला पत्रकाराची नजर त्यांच्यावर पडली आणि ती पोलिसांकडे जाऊ लागली. महिला पत्रकाराला आपल्या दिशेने येताना पाहून स्कूटीवरील दोन पोलीस खाली उतरतात आणि असे काही वागू लागतात की, आम्ही काहीच केले नाही. यानंतर या महिला पत्रकाराने वारंवार विचारणा करूनही पोलीस काहीच केले नसल्याचे सांगत आहेत.
परंतु तेथे नक्की काय घडलं, ही संपूर्ण घटना कॅमेरात मात्र कैद झाली आहे. या व्हिडीओवरती लोक भरभरुन कमेंट्स करत आहेत. तर असे अनेक लोक आहेत, जेया व्हिडीओला शेअर आणि लाईक्स करत आहेत. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे.