मुंबई : एकमेकांना मदत करणे हा मानवतेचा धर्म आहे आणि आपण तो पाळावा असे अनेक थोरामोठ्यांनी आपल्याला सांगितले आहे. तसेच अनेकांचे असे देखील म्हणणे आहे की, देवाने आपल्याला माणसाचं रुप दिलंय ते इतरांना मदत करण्यासाठीच. त्यामुळे आपण नेहमीच एकमेकांना मदत करत राहावी. सोशल मीडियावर याच संदर्भात एक फोटो व्हायरल होत आहे. जो इंटरनेटवरील सर्वात सुंदर आणि हृदयस्पर्शी व्हिडीओ बनला आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावरील सर्वात ट्रेंडिंग फोटोंपैकी एक ठरला आहे.
सोशल मीडियावर आपल्या अनेक गोष्टी शिकायला, पाहायला आणि जाणून घ्यायला मिळतात. येथे चांगल्या वाईट अशा अनेक गोष्टी असतात. त्यातून आपण काय घ्यायचं हे आपलं आपणचं ठरवायचं असतं.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या हा फोटो एक ट्रॅफिक पोलिस आणि एका दिव्यांग व्यक्तीचा आहे. ज्यामध्ये हा ट्रॅफिक पोलिस या दिव्यांगाला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत आहे.
जोपर्यंत हा दिव्यांग व्यक्ती हा रस्ता पार करत नाही, तोपर्यंत यासाठी ट्राफिक पोलिसाने संपूर्ण रस्त्यावरील ट्राफिक थांबवून ठेवली होती. यामुळेच या फोटोने सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
इससे ख़ूबसूरत तस्वीर और क्या हो सकती है. pic.twitter.com/afX5QWZG83
— Awanish Sharan (@AwanishSharan) March 5, 2022
आजकालच्या धवपळीच्या दिवसात बऱ्याचदा आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीची मदत करण्यासाठी वेळ मिळत नाही, तेथे या पोलिसाने एका दिव्यांगाला महत्व देत, त्याला मदत केली. ज्यामुळे लोकांना हा फोटो फार आवडला आहे.
हा फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. फोटो शेअर करण्यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'यापेक्षा सुंदर फोटो काय असू शकते'. बातमी लिहिण्यापर्यांत 14.4 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केलं आहे, तर 1 हजाराहून अधिक लोकांनी पोस्ट रिट्विटही केलं आहे.