जुनी वाहनं असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा दिलास

मोटार वाहनांची मुदत संपलेल्या कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. 

Updated: Mar 27, 2021, 08:58 PM IST
जुनी वाहनं असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा दिलास title=

मुंबई: जुनी वाहनं ज्या नागरिकांकडे आहेत त्यांच्यासाठी मोठा दिलासा केंद्र सरकारनं दिला आहे. मोटार वाहनांची मुदत संपलेल्या कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी पुन्हा एकदा मूदतवाढ दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही सूचना जारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अनेक नागरिकांना काही कारणांमुळे अथवा कोरोनामुळे आपल्या कागदपत्रांचं नुतनीकरण करता आलं नसेल तर अशा लोकांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक वाहन चालक किंवा वाहन धारकांना कागदपत्राची मुदत संपल्यामुळे मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. 

मिळालेल्या माहितीनुसार मंत्रालयाकडून यापूर्वी 30 मार्चपर्यंत कागदपत्र रिन्यू करण्याची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता वाढवण्यात आली असून 30 जून 2021 पर्यंत नागरिकांना कागदपत्र रिन्यू करता येणार आहेत. कोरोनामुळे अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी कमी आहेत. तर काही कार्यालयं बंद असल्यानं अनेक समस्यांचा सामना वाहन चालक, धारकांना करावा लागत आहे. अशा नागरिकांसाठी ही मुदतवाढ झाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. 

वाहन चालकांचं लायसन, वाहनासंबंधी कागदपत्र किंवा इतर सर्व प्रकारचे कागदपत्र जर रिन्यू करायची राहिली असतील तर आता 30 जूनपर्यंत ती करता येणार आहेत. जवळपास 3 महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे. 

Tags: