Jobs Openings In Wipro : खूशखबर...खूशखबर...खूशखबर...फ्रेशर्स आणि नोकरी गमावलेल्या उमेदवाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमेरिकेमध्ये अनेक कंपन्यांमधून कर्मचारी कपात (Staff reduction) सुरु असताना भारताच्या टेक कंपनीच्या या घोषणेनंतर अनेकांना दिलासा मिळाला आहे. फेसबुक (Facebook), मेटा (Meta), अॅमेझॉन (Amazon) आणि ट्विटरमधून (Twitter) अनेक कर्मचाऱ्यांना अचानक काढण्यात आलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं (Job Cuts) वातावरण होतं. अशातच भारतातील विप्रो या कंपनीने बंपर नोकर भरतीची घोषणा केल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे.
विप्रो ही भारतातील आयटी क्षेत्रातील सर्वात नावाजलेली कंपनी आहे. विप्रो कंपनी अनेक वेळा फ्रेशर्ससाठी बंपर ओपनिंगची घोषणा करत असते. यंदाही फ्रेशर्स आणि टेक तज्ज्ञांसाठी त्यांनी नोकरीची सुवर्णसंधी दिली आहे. विशेष म्हणजे लोखांच्या पगारासह वर्क्र फ्रॉम होम असं दुहेरी छप्पड फाडके संधी दिली आहे. (trending news Bumper Vacancy and Jobs in Wipro 2022)
कंपनींना 'या' लोकांची गरज
1. ब्रँड-रिस्पॉन्सिव्ह वेब डिझाईन आणि नेटिव्ह अॅप्समध्ये विकसित कौशल्य
2. अॅक्सेसिबल डिझाईनचा अनुभव
3. पॅटर्न लायब्ररी सांभाळणं आणि विकसित करणं
4. फिग्मामध्ये डिझाईन सिस्टम तयार करण्याचा अनुभव
5. वेगवेगळ्या स्कॉड्ससह मोठ्या रि-डिझाईन उपक्रमांचं प्लॅनिंग आणि रचना करण्याची क्षमता
6. ऑटॉमिक डिझाईन प्रणाली तयार करण्याचा अनुभव
7. डिझाईन सिस्टीम तयार करण्याचा आणि देखरेखीचा किमान चार वर्षांचा अनुभव
जागा - युजर इंटरफेस डेव्हलपरशिवाय पीएल/ एसक्यूएल डेव्हलपर (PL/SQL Developer)
1. ओरॅकल PL/SQL वापरून हँड-ऑन डेव्हलपमेंटचा किमान सहा-सात वर्षांचा अनुभव
2. तांत्रिक सहाय्य, प्रॉब्लेम सोल्युशन आणि ट्रबल शूटिंग सपोर्ट प्रदान करण्याची क्षमता
3. सर्व PL/SQL पॅकेजेसमध्ये आवश्यक असल्यास बदलांचे निरीक्षण करणं, बदलांची शिफारस करणं, संग्रहित कार्यपद्धती प्रदान करणं आणि विविध रिलेशन डेटाबेस तयारची क्षमता
4. टेबल्स, इंडेक्सेस, डीबी लिंक्स आणि विशेषाधिकार तयार करणं आणि व्यवस्थापित करणं
5. टेबल्स, इंडेक्सेस, टेबलस्पेसेस, ऑडिटिंग आणि डेटा गुणवत्ता तपासणी तयार आणि व्यवस्थापित करण्यासाठी DBA सह समन्वय साधणं
6. क्लिष्ट गणना पूर्ण करण्यासाठी जावा डेव्हलपर्सच्या टीमशी समन्वय साधण्याचं कौश्यल