भारतीय कर्मचाऱ्यांना अॅमेझॉन दणका देणार? शेकडो भारतीयांच्या नोकऱ्या जाणार?

ट्विटर, फेसबुकनंतर अॅमेझॉनकडून नोकरकपात, Amazon मधल्या या विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, वाचा

Updated: Nov 29, 2022, 10:50 PM IST
भारतीय कर्मचाऱ्यांना अॅमेझॉन दणका देणार? शेकडो भारतीयांच्या नोकऱ्या जाणार? title=

Global Recession in 2022 : जगभरात नोकरकपातीची (Job Cuts) लाट आलीय. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून (Multinational Companies) कर्मचारी कपात सुरु झालीय. Facebook, Twitter नंतर आता अॅमेझॉनही (Amazon) शेकडो कर्मचाऱ्यांना काढण्याच्या तयारीत आहे. मात्र यावेळी भारतातल्या शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संक्रांत येणार आहे. पुढच्या महिन्यात ही कपात होणार आहे. अॅमेझॉन आपली अनेक ऑपरेशनल युनिट बंद करणार आहे, जॉब कटच्या लेटेस्ट रिपोर्टमधून ही माहिती समोर आलीय. अॅमेझॉनमुळे कोणत्या कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते पाहुयात..

शेकडो भारतीयांच्या नोकऱ्या जाणार? 

पाकिटबंद अन्नपदार्थ होम डिलिव्हरी सेवा अॅमेझॉन बंद करतंय

दोन महिन्यांसाठी ही सेवा बंद केली जाणार आहे

शेअर सर्व्हिस, बॅक ऑफिस आणि रिटेल ऑपरेश या क्षेत्राशी निगडीत शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोक-या जाणार आहेत

काही दिवसांपूर्वी अॅमेझॉनकडून दहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे संकेत देण्यात आले होते. त्याची आता सुरुवात होताना दिसतेय. दरम्यान नोकरकपात करणारी अॅमेझॉन ही पहिली कंपनी नाही.. आतापर्यंत

जगात नोकरकपातीची लाट 

ट्विटरनं  3 हजार 700 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

सीगेटमधून 3000 जणांच्या नोकऱ्या गेल्या

मायक्रोसॉफ्टमधून 1000 कर्मचाऱ्यांना काढलं

स्नॅप चॅटमधून 20 % कर्मचारी कपात

ई-कॉमर्स स्टार्टअप उडानमधून 350 नोकऱ्या गेल्या

इंटेलमध्येही मोठ्या प्रमाणात नोकर कपातीचं संकट

ब्रेनलीनं भारतातील 35 पैकी 30 लोकांना नोकरीवरून काढलं

बायजूस, अनअकॅडमी, वेदांतू, व्हाईटहॅट ज्युनियर, ओला कंपन्यांकडून मोठी कपात

आतापर्यंत जगभरात नोकरकपातीची लाट आलेली होती. भारतातील मल्टिनॅशनल कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना याचा फारसा फटका बसलेला नव्हता. पण आता हे नोकरकपातीचं संकट भारताच्या दरवाजापर्यंत पोहचलंय, ज्याची सुरुवात अॅमेझॉनपासून झालीय.