Trending News : केरळाल्या तिरुवनंतपुरममध्ये हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. इथल्या तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजच्या (Thiruvananthapuram Medical Collage) लिफ्टमध्ये तब्बल दोन दिवस एक व्यक्ती अडकून पडली Man Stuck in Lift) होती. शनिवारी अडकलेल्या या व्यक्तीला सोमवारी बाहेर काढण्यात आलं. धक्कादायक म्हणजे एखादी व्यक्ती दोन दिवस लिफ्टमध्ये अडकलीय याचा कोणताच थांबपत्ता रुग्णालय प्रशासनाला नव्हता. पीडित व्यक्तीचं नाव रविंद्रन असं आहे. दोन दिवस गायब असल्याने रविंद्रनच्या कुटुंबियांनी पोलिसात मिसिंग तक्रार दाखल केली होती. प्रकरण बाहेर आल्यानंतर तामिळनाडूच्या (Tamilnadu) आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी वैद्यकीय विभागाला प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
तिरुवनंतपुरममध्ये राहाणारे 59 वर्षांचे रविंद्रन केरळ विधानसभेत काम करतात. आपल्या वैद्यकीय तपासणीसाठी रविंद्रन तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी त्यांनी रुग्णालयाच्या लिफ्टचा वापर केला. पण लिफ्टचा दरवाजा उघडला आणि ती बंद पडली. मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयाची लिफ्ट अनेक दिवसांपासून नादुरस्त होती. पण यानंतरही लिफ्टच्या बाहेर रुग्णालय व्यवस्थापनाने लिफ्टचा वापर करु नये किंवा लिफ्ट बंद असल्याचा कोणताही बोर्ड लावला नव्हता.
रविंद्रन बेशुद्ध अवस्थेत सापडले
शनिवारी रविंद्रन हे रुग्णालयात आले होते. त्यानंतर दोन दिवस ते बंद लिफ्टमध्ये अडकले. सोमवारी जेव्हा दुरुस्तीसाठी लिफ्ट उघडण्यात आली, त्यावेळी रविंद्रन लिफ्टमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले, त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
काय झालं त्या दिवशी?
शुद्धीवर आल्यानंतर रविंद्रन यांनी मीडियाला त्यादिवशी नेमकं काय झालं याची माहिती दिली. त्यांनी सांगितलं. बटन दाबताच लिफ्टचे दरवाजे उघडले, पण आत शिरताच अचानक मोठा आवाज करत दरवाजे बंद झाले. या गडबडीत रविंद्रन यांच्या हातून मोबाईल पडला आणि तुटला. लिफ्टमध्ये काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आल्यानंतर रविंद्रन यांनी इमरजन्सी बटन दाखवण्याचा प्रय्तन केला. पण याचा काहीही उपयोग झाला नाही. रविंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार लिफ्ट तळ मजल्यावरुन पहिल्या मजल्यावर गेली. पण पुन्हा तळमजल्यावर आणि बंद पडली.
मदतीसाठी रविंद्रन यांनी आरडाओरडा केला, पण त्यांचा आवाज कोणापर्यंतच पोहोचला नाही. दुसरीकडे रविंद्रन अचानक गायब झाल्याने त्यांचं कुटुंब धास्तावलं. त्यांनी बरीच शोधाशोध केली पण रविंद्रन न सापडल्याने त्यांनी अखेर पोलिसात तक्रार दाखल केली.
सोमवारी रविंद्रन सापडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर रुग्णालय प्रशासनविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.