ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट! 2-3 नाही तर चक्क 7 जण बाईकवर; अशी मारली धूम; Video व्हायरल

 ओ शेठ, नादच केलाय थेट, असे म्हणण्याची वेळ आलेय. एका व्यक्तीने हद्दच केल्याचे दिसून येत आहे.  सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कुटुंबातील सात जण एकाच बाईकवर जाताना दिसत आहे. 

Updated: Sep 1, 2022, 11:05 AM IST
ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट! 2-3 नाही तर चक्क 7 जण बाईकवर; अशी मारली धूम; Video व्हायरल title=

मुंबई : Bike Viral Video: ओ शेठ, नादच केलाय थेट, असे म्हणण्याची वेळ आलेय. एका व्यक्तीने हद्दच केल्याचे दिसून येत आहे.  सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कुटुंबातील सात जण एकाच बाईकवर जाताना दिसत आहे. या घटनेने सोशल मीडियावर लोकांकडून भन्नाट प्रतिक्रिया देत आहे. बाईकचा हा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी ट्विटरवर अपलोड केला आहे. या व्हिडिओत  एक व्यक्ती त्याच्या मोटारसायकलवर दोन मुलांसह बसला आहे. त्यानंतर आणखी तीन मुले आणि दोन महिला बाईकवर बसतात आणि त्यांची मुलंही त्यांच्या कडेवर दिसत आहेत. एका बाईकवर चक्क सात जण बसतात, हे या व्हिडिओवरुन दिसून येत आहे.

एका कुटुंबातील सात जण एकाच बाईकवर बसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचवेळी सगळे नियम धाब्यावर बसून हे सगळं झाल्याने संताप व्यक्त होत आहे. कुटुंबातील इतर लोकही मोटारसायकलवर बसतात. दुचाकीस्वार किंवा महिला आणि लहान मुलेही हेल्मेट घालत नसल्याचेही दिसून येते. आयएएस अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले- 'मी नि:शब्द' (Speechless)

दुचाकीवर लहान मुलांसह महिला असे 7 जण  

लोक बाईकवर कसे बसू लागतात हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. निळ्या साडीतील एक महिला एका मुलाला उचलून बाईकवर बसलेल्या व्यक्तीसमोर बसवते आणि त्यानंतर दुसरे मूलही त्या व्यक्तीच्या समोर बसते. दुचाकीस्वाराच्या मागे दुसरी महिला बसली आणि सर्व काही व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्याने दुसरा पाय त्याच्या एका पायाच्या वर ठेवला आणि एका मुलाला त्याच्या वर बसवले. यानंतर निळ्या साडीतील महिलेने शेवटच्या मुलाला उचलून दुचाकीच्या मागे बसते. या दुचाकीवर एकूण सात जण आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे समोरील रस्त्यावरुन बससह अवजड वाहने भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल  

व्हिडिओला ट्विटरवर 1.2 कोटीहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत आणि यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अनेकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करुन लोक आपला जीव कसा धोक्यात घालत आहेत, यावर बोलत आहेत तर काहींनी असा युक्तिवाद केला की योग्य वाहतूक सुविधा नसल्यामुळे त्यांनी याचा अवलंब केला. एका यूजरने लिहिले की, 'दुचाकीवर सात लोक. दुचाकी घसरली तर मुलांचे काय होईल? दुचाकीचा मालक आणि दुचाकीस्वार यांना अटक करून वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यात यावा. काही व्हिडिओंनी स्क्रिनग्रॅब शेअर केले आहेत, ज्यात कुटुंब ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.