लॉलीपॉप खाण्यासाठी जुगाड करणाऱ्या चिमुकल्याला काय शिक्षा द्याल? की हसून सोडून द्याल

सध्या एका लहान मुलाचा लॉलीपॉप खात असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

Updated: Mar 19, 2021, 12:58 PM IST
लॉलीपॉप खाण्यासाठी जुगाड करणाऱ्या चिमुकल्याला काय शिक्षा द्याल? की हसून सोडून द्याल title=

Viral Video : समाजमाध्यमांवर  काय  व्हायरल होईल याचा भरवसा नाही. सध्या एका लहान मुलाचा लॉलीपॉप खात असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही म्हणाल नुसत्या लॉलीपॉप खाण्यामध्ये काय विशेष व्हायरल होण्यासारखं? हा व्हिडिओ तुम्ही  पहाल तर तुम्ही  तुमचं हसू आवरू शकणार नाही. या बाळाच्या निरागसपणाचा व्हिडिओ काय व्हायरल होतोय ते पाहूया

लहानपणी शाळेत जाऊन मस्ती, मजा करण्याचा आनंद आपण घेतला आहे. शाळेत प्रार्थना म्हणताना शिस्त पाळणं खुप महत्वाचं असतं. असाच प्रार्थना म्हणताना एका लहानग्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आयएएस अधिकारी अवनीश शरन यांनी आज ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात शाळेतील लहान मुले हात जोडून आणि  'डोळे बंद करून इतनी शक्ति हमे देना दाता' ही प्रार्थना म्हणत आहेत.

त्या रांगांमधील एक लहानगा मुलगा दोन्ही जोडलेल्या हातांमध्ये लॉलीपॉप घेऊन खात आहे.  आणि प्रार्थनाही म्हणत आहे. या मुलाचा या निरागस व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तेव्हा तु्म्ही म्हणाल वाह रे पठ्ठ्या!