Video : एका मुलासाठी 5 तरूणींनी तरुणीला झोडपलं, भर जत्रेत झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव

Viral Video : सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये भर जत्रेत तरुणींचा तुफान राडा पाहिला मिळतोय. या व्हिडिओमध्ये एका मुलीवर 5 तरुणी तुटून पडल्या. झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव करण्यात आला आणि तोही एका तरुणासाठी...काय नशीबवान आहे पोरगा 

Updated: Nov 29, 2022, 01:59 PM IST
Video : एका मुलासाठी 5 तरूणींनी तरुणीला झोडपलं, भर जत्रेत झिंज्या उपटल्या, लाथाबुक्यांचा वर्षाव title=
trending video boyfriend was caught red handed girl fight at Mela viral on Social media nmp

Trending Girls Fight Video : सोशल मीडियावर (Social media) नेटकऱ्यांना तरुणींच्या राडाचा एक व्हिडिओ (Video) लक्ष वेधून घेतो आहे. जत्रेमधील अनेक जण मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत, नवरा बायको (husband wife Video) तर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड (Girlfriend Boyfriend Video)  फिरायला जातात. पण जर आपल्या प्रियकर दुसऱ्या तरुणीसोबत फिरताना दिसला तर...असाच काहीसा हा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये 5 जणींनी त्याला रंगेहाथ पडकलं आणि त्यानंतर जत्रेमध्ये WWE चा थरार पाहिला. 

व्हायरल व्हिडिओ 

बिहारमधील (Bihar) सारणमधील जत्रेत (Mela) एक तरुण आपल्या मैत्रीणीसोबत फिरत होता. तेवढ्यात तिथे त्याची प्रियसी आली. माझ्या बॉयफ्रेंडसोबत फिरतेस काय, असं विचारत त्या तरुणीसोबत तिच्या इतर चार मैत्रीणींनी तुला मारहाण करायला सुरुवात केली. तिचे केस उपटले, बाथाबुक्या मारल्या, दे दणादण  (Girls Fight Video) तिच्यावर या 5 तरुणी तुटून पडल्या. तरुणाने त्या मुलीला वाचविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न केला. 

हेही वाचा - Video : दे धपाधप! कॉलेजमध्ये तरुणींची फ्री स्टाइल, कारण ऐकून बसेल धक्का

पण त्या काही केल्या ऐकतं नव्हत्या आणि त्या एका तरुणासाठी  5 मुलींनी भर जत्रेत राडा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्या तरुणीचे केस खेचून तिला खाली पाडण्यात आलं. काही केल्या या तरुणी ऐकायला तयार नव्हता. त्या पुरेपूर त्या तरुणीवर हात साफ करत होत्या.(trending video boyfriend was caught red handed girl fight at Mela viral on Social media)

हा राडा जत्रेत असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि त्यानंतर सोशल मीडियावर शेअर केला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियाचे इतर प्लॅटफॉर्मवर ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम (Twitter, Facebook and Instagram) व्हायरल होतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तरुणींची फ्री स्टाईल हाणामारीचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.  हा व्हिडिओ ट्विटरवर राहुल कुमार या यूजर्सने आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे.