Trending video : डोळ्यांसमोर मृत्यू दिसूनही भारतीय जवान आपल्या कर्तव्यावर ठाम, King Cobra चा धक्कादायक व्हिडीओ

King Cobra Video:किंग कोब्रा फना काढून बसला होता. किंग कोब्राच्या एका वाराने मृत्यू अटळ असतानाही...

Updated: Oct 16, 2022, 05:35 PM IST
Trending video : डोळ्यांसमोर मृत्यू दिसूनही भारतीय जवान आपल्या कर्तव्यावर ठाम, King Cobra चा धक्कादायक व्हिडीओ  title=
Trending video King Cobra and Army sniper Viral video on Social media nmp

Viral video of Army sniper: सोशल मीडियावर (Social media) रोज सेकंद सेकंदाला अनेक व्हिडीओ ट्रेंड (Trending video) आणि व्हायरल (Viral) होत असतात. यातील काही व्हिडीओ आपल्याला हसवतात, काही आपल्या थकवा घालवतात तर काही व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो तो नेटकऱ्यांचा थरकाप उडवतोय. तरदुसरीकडे हा व्हिडीओ पाहून भारतीय सैनिकांविषयी आपली छाती गर्वाने आणि अभिमानाने फुगवणार...हा व्हिडीओ प्रत्येक भारतीयांने बघावा असा आहे. 

सलाम तुझ्या धैर्याला!

जगातील सर्वात खतरनाक सापामध्ये (Snake) किंग कोब्राची (King Cobra) गणना होते. साप पाहिला की अनेकांची हवा गुल होते. अशात जर विशाल असा किंग क्रोबा जर आपल्यासमोर आला तर काय होईल...विचार करुनच भीती वाटते ना? पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये डोळ्यासमोर मृत्यू दिसतो आहे पण...(Trending video King Cobra and Army sniper Viral video on Social media nmp )

साहस आणि शौर्या अतुलनीय 

जिथे अखंड भारताला निर्दोष सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारतीय जवान (Indian soldier) दक्ष राहतात, तिथे मृत्यू समोर उभं असतानाही आपल्या कर्तव्यावर ठाम असलेला हा जवान खरंच त्याचा धैर्याला सलाम...या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सैन्याचा स्नायपर त्याच्या शस्त्रासह लपला आहे. तर त्याचा शस्त्रावर किंग कोब्रा फना काढून बसला होता. किंग कोब्राच्या एका वाराने मृत्यू अटळ असतानाही हा जवान जागीच राहिला. एक क्षणही तो जागचा हल्ला नाही. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांचा थरकाप उडाला, मात्र अरुणाचल सीमेवरील या व्हिडीओने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय लष्कर खरोखरच साहस आणि शौर्यामध्ये अतुलनीय आहे.