Viral Video : अचानक जंगलातून 'त्या' व्यक्तीसमोर आला बिबट्या, वाहतूक खोळंबली अन् मग...

Viral Video : एका आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अचानक एका व्यक्तीसमोर बिबट्या येऊन उभा राहतो आणि मग...हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना घाम फुटला आहे. 

Updated: Apr 1, 2023, 01:15 PM IST
Viral Video : अचानक जंगलातून 'त्या' व्यक्तीसमोर आला बिबट्या, वाहतूक खोळंबली अन् मग... title=
Trending Video Leopard Shocking video hugging man and playing Viral Video on Social media

Leopard Viral Video : सोशल मीडिया हा अनेक व्हिडीओचा खजिना आहे. या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर कपल व्हिडीओ (Couple videos), लग्नातील वधू वराचे व्हिडीओ (bride groom video) , डान्सचे व्हिडीओ (Dance videos) अगदी लहान मुलांचे व्हिडीओ पाहिला मिळतात. या व्हिडीओ यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. त्याशिवाय अपघाताचे धक्कादायक व्हिडीओ ही या पाहिला मिळतात. वन्यजीव प्राण्याचे (wildlife video) थरकाप उडवणारे व्हिडीओही तुफान व्हायरल होता. (Shocking video)

अन् बिबट्या समोर आला...

गेल्या काही वर्षांमध्ये जंगल परिसरात पर्यटनांमुळे आपला वावर वाढल्यानंतर वन्यप्राणी अनेक वेळा रस्त्यावर येताना दिसतं आहे. महाराष्ट्रातील जंगल परिसराजवळील गावांना कायम बिबट्याचा हल्लाचा धोका असतो. लहान मुलांपासून महिलांवर बिबट्याने हल्ल्या केल्याचा अनेक घटना आहेत. खास करुन उन्हाळ्यात खाण्याचा आणि पाण्याचा शोधतात वनप्राणी हे शहरी भागात येतात. 

थरकाप उडविणारा व्हिडीओ 

डोंगराळ आणि जंगली भागातून प्रवास करताना अनेक वेळा रस्त्यावर वन्यप्राणी अचानक रस्त्यावर येतात. गेल्या वर्षी गुजरातमधील महामार्गावर सिंहाचं कळप दिसून आलं होतं. या व्हिडीओमध्ये अचानक एका व्यक्तीच्या समोर बिबट्या येतो आणि मग...हा थक्क करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Trending Video Leopard Shocking video hugging man and playing Viral Video on Social media)

अन् त्या बिबट्याने त्या व्यक्तीला मिठी मारली

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक डोंगराळ भागातून रस्त्यावरुन जात असताना तिथे अचानक एक बिबट्याचं पिल्लू येतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ते लहानसं पिल्लू कदाचित जंगलातून भटकलं असावं. विशेष म्हणजे हे बिबट्याचं पिल्लू माणसांवर हल्ला करत नाही. तर तो त्यांचासोबत खेळू लागतो. एवढंच नाही तर तो एका व्यक्तीला मिठी मारतो. हे पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. 

थक्कं करणारा व्हिडीओ

हा थक्कं करणारा व्हिडीओ ट्विटरवर @HumanAreMetal या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ जुना असल्याचं बोलं जातं आहे. पण आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एवढंच नाही तर हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. 

या व्हिडीओला आतापर्यंत 4 लाख 10 हजारांहून अधिक व्ह्यूज तर 19 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् होतं आहेत.