रेल्वे ट्रॅकवरून चालत येणारी महिला अचानक गायब; पाहणाऱ्यांमध्ये एकच खळबळ... Video Viral

Video Viral पाहून तुम्हालाही बसेल धक्का  

Updated: Oct 26, 2022, 01:25 PM IST
रेल्वे ट्रॅकवरून चालत येणारी महिला अचानक गायब; पाहणाऱ्यांमध्ये एकच खळबळ... Video Viral title=

Video Viral From the railway tracks: काही लोक त्यांच्या विचारात वावरत असतात. अशा लोकांना आपल्या आजू-बाजूला काय सुरु आहे, हे देखील माहित नसतं. पण काहीवेळा असे करणं खूप धोकादायक ठरू शकतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये काही लोक रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसत आहेत. त्याच वेळी एक महिला स्वतःच्या विचारात रेल्वे ट्रॅक ओलांडत होती. पण रेल्वे जवळ येत असल्याच कळताच ती जीव मुठीत घेवून पळून जाते.  

महिलेचा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसलाच. याशिवाय व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या तर, काहींनी मात्र महिलेची खिल्ला उडवली. ट्रेन येताना पाहून अचानक गायब झालेल्या महिलेला पाहणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाहा व्हिडीओ...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इंस्टाग्रामवर sakhtlogg नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 'आंटी वॉक पे निकली है' असे कॅप्शन लिहिले आहे. हे दृश्य पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. सध्या सर्वत्र या व्हायरल व्हिडीओची चर्चा आहे.