मुंबई : सोशल मीडियावर (social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (video viral) होत असतात. यातील काही व्हिडिओ हे खुप मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ हे खुपच आश्चर्यकारक असतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहुन अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.
सोशल मीडियावर (social media) काही दिवसांपुर्वी एका दुर्मिळ माशाचा व्हिडिओ व्हायरल (video viral) झाला होता. या दुर्मिळ माशाला दोन तोंड आणि चार डोळे होते. ही घटना पाहून अनेकांना धक्का बसला होता. आता अशीच एक घटना समोर आली आहे.या घटनेत दुर्मिळ कासव (unique baby turtle) सापडल्याची घटना घडलीय. हा कासव पाहून अनेकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीए.
व्हिडिओत काय?
इंस्टाग्राम snakebytestv वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एका डोळ्याचा कासव (unique baby turtle) दिसत आहे.हे कासवाच लहान पिल्लू आहे.हा सफेद रंगाचा कासव आहे. त्याला चार हात आणि पाठीवर कवच आहेत. फक्त त्याला एकच डोळा आहे. खरं तर प्रत्येक प्राण्याला दोन डोळे असतात. मात्र या घटनेत कासवाला (unique baby turtle) एकच डोळा आहे, हे पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. हा व्हि़डिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
अनुवांशिक विकारांमुळे अवयवांमध्ये असमानता
कमी-अधिक लैंगिक अवयवांसह सजीव जन्माला येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशाच एका माशाचा व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाला होता, ज्यामध्ये त्याला चार डोळे आणि दोन तोंडे होती.त्याचवेळी एकाच शरीरात 2 डोकी असलेल्या अशा सापाचा व्हिडिओही समोर आला होता. हे अनुवांशिक विकारामुळे होते. कधीकधी अशा शारीरिक फरक असलेल्या प्राण्यांना जगणे खूप कठीण होते. सहसा ते दीर्घ आयुष्य जगत नाहीत.
दरम्यान एका डोळ्याच्या कासवाचा (unique baby turtle) हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.या व्हिडिओवर लोकांच्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया येत आहेत.