विद्यार्थिनीने सॅनिटरी पॅडसंबंधी प्रश्न विचारला, अधिकाऱ्याने दिलं असं संतापजनक उत्तर, पाहा Video

शालेय कार्यक्रमात विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नावर महिला अधिकाऱ्याने दिलं संतापजनक उत्तर

Updated: Sep 29, 2022, 08:34 PM IST
विद्यार्थिनीने सॅनिटरी पॅडसंबंधी प्रश्न विचारला, अधिकाऱ्याने दिलं असं संतापजनक उत्तर, पाहा Video title=

Trending News : राज्य सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी (Girl Student) एक उपक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी IAS अधिकाऱ्यांना प्रश्न विचारता आणि याला अधिकाऱ्यांकडून योग्य उत्तरं दिली जातात. या उपक्रमातंर्गत शालेय कार्यक्रमात विद्यार्थिनीने विचारलेल्या एका प्रश्नाला महिला अधिकाऱ्याने संतापजनक उत्तर दिलं. बिहार राज्यातला हा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

महिला अधिकाऱ्याचं उत्तर
या कार्यक्रमात विद्यार्थिनीने त्या महिला अधिकाऱ्याला विचारलं, सरकारी किमतीत मुलींना सॅनिटरी पॅड (Sanitary Pads) देऊ शकतं का? यावर ती महिला अधिकारी संतापत उत्तर दिलं, लोकांच्या मागण्यांना अंत नाही, लोकं काही ना काही मागतच असतात, उद्या कंडोमही (Condom) मागायला सुरुवात कराल. 

पाकिस्तानात जाण्याचा दिला सल्ला
महिला अधिकाऱ्याने दिलेल्या उत्तरावर विद्यार्थिनीने जनतेच्या मतानेच सरकार बनतं याची आठवण करुन दिली. विद्यार्थिनीच्या उत्तराने ती महिला अधिकारी आणखीनच संतापली तीने त्या विद्यार्थिनीला हा प्रश्न मुर्खपणाचा कळस असल्याचं म्हटलं, तसंच तुम्ही मतदान करु नका, पाकिस्तानात जा असा सल्लाही दिला. ती महिला अधिकारी इथंच थांबली नाही तर तुम्ही पैसे आणि सेवांसाठी मत देता का? असा उलटा प्रश्नही विचारला.

लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया
एक वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि एक सामान्य विद्यार्थी यांच्यातील हा संवाद ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. UNICEF आणि इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने 'सशक्त बेटी, समृद्धी बिहार' कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमात महिला व बालविकास महामंडळाच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक हरज्याोत कौर भामरा यांनी वादग्रस्त उत्तरं दिली.

टॉयलेटच्या तक्रारीवरही विचित्र उत्तर
जनजागृती कार्यशाळेत एका मुलीने विचारलं 'शाळेतील मुलींचं टॉयलेट तुटलेलं आहे. अनेकदा मुलंही आत जातात. टॉयलेटमध्ये जावं लागू नये यासाठी मुली कमी पाणी पितात. यावर हरजोत कौर म्हणाल्या तुम्ही खूप गोष्टी मागत राहिलात तर ते कसं चालेल? पाकिस्तानात जाण्याच्या सल्ल्यावर एका मुलीने उत्तर दिलं मी भारतीय आहे, मी पाकिस्तानात का जाऊ? यावर भामरा यांनी तुमचे विचार बदलण्याची गरज असल्याचं तिला सांगितलं. तुम्हाला भविष्यात स्वतःला कुठे बघायचे आहे हे ठरवावं लागेल, तू जिथे आहेस तिथेच बसायचं की मी बसलेय त्या बाजूला बसायचं आहे, असंही भामरा यांनी बजावलं.