Viral Video : झाडावरील आंबे तोडण्यासाठी पत्नीला उचलं अन् नवऱ्याची झाली ना राव फजिती...

Mango Viral Video : उन्हाळ्याची सुट्टी आणि आंब्यांचा सिझन (Alphanso Mango)...मग काय राव मजाच मजा...कोकणात मुंबईतील लोकांसोबत राज्यातील अनेक पर्यटक फिरायला येतात. विकेंडला तर सगळे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललं असतात. सोशल मीडियावर नवऱ्याची सगळ्यांसमोर झालेल्या फजितीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 

नेहा चौधरी | Updated: May 5, 2023, 03:01 PM IST
Viral Video : झाडावरील आंबे तोडण्यासाठी पत्नीला उचलं अन् नवऱ्याची झाली ना राव फजिती... title=
Trending wife pluck mangoes trying husband pants slip video viral on social media

Trending Viral Video : उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाचा प्रिय आंब्याचा सिझन...महाराष्ट्रातील कोकण असो किंवा भारतात अनेक ठिकाणी झाडांना मस्त आंबे लागले आहेत. महाराष्ट्रात यंदा अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याची (Alphanso Mango) आवक कमी झाली आहे. लहान बच्चे कंपनी असो किंवा महिला वर्ग यांना कच्च्या कैऱ्या खायलाही खूप आवडतं. चटपटीत अशी कैरी झाडांची तोडून खाण्यात मजाच काही औरच असते. 

सोशल मीडियावर असाच आंबे तोडणाचा नवरा बायकोचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी हसू थांबवूच शकत नाही आहे. हा मजेदार व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे.  (Trending wife pluck mangoes trying husband pants slip video viral on social media)

अन् नवऱ्याची फजिती झाली...

झालं असं की वनराई असलेल्या परिसरात नवरा बायको मस्त फेरफटका मारत असतात. तेवढ्यात त्यांना आंब्याचं झाड दिसतं. मग काय बायको झाडावरील कैरी खायची इच्छा झाली. पण कैरी तोडायची कशी ? झाड तर खूप वरती आहे. अशात ते शक्कल लढवतात. नवरा बायकोला उचलून घेतो. त्यांचासोबत असलेल्या लोकांनी नवरा बायकोमधील रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद करायला घेतला.

काय राव तुम्ही पण!

रोमँटिक क्षण राहिला बाजूला नवऱ्याची फजिती कॅमेऱ्यात कैद झाली. नवऱ्याने जसं बायकोला उचलं त्याचा काही वेळातच नवऱ्याची पॅन्ट खाली घसरली. हा मजेशीर प्रसंग पाहून त्यांचा सोबत असलेली लोक हसायला लागली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Funny Sandip (@funny_sandip)

व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये  

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामवरील संदीप नामाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ इतर प्लॅटफॉर्मवर व्हायरल होतो आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 25 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.