पाकिस्तानकडून गोळीबार, दोन भारतीय अधिकारी शहीद

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजळ (एलओसी) येथे पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन अधिकारी शहीद झालेत.  

ANI | Updated: Dec 21, 2018, 11:51 PM IST
पाकिस्तानकडून गोळीबार, दोन भारतीय अधिकारी शहीद  title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजळ (एलओसी) येथे पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन अधिकारी शहीद झालेत. पाकिस्ताकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने सकाळी ११.५५ वाजता गोळीबार केला. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत. 

केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या गोळीबारादरम्यान लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला. तर दुसरा अधिकारी जखमी झाला. मात्र, उपचारादरम्यान या अधिकाऱ्याचा रुग्णालयात निधन झाले. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.