Two School Girls Fights : सोशल मीडियावर काहीही व्हायरल होतं. जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्हाला माहितच असेल की रोज किती तरी गोष्टी व्हायरल होत असतात. कधी लोकं भयानक स्टंट करतायेत तर कधी स्वतःच्याचं जिवाशी खेळतायेत. व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी कोणतीही फॅशन स्टाईल करतात. याशिवाय सोशल मीडियावर बऱ्याचं प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात त्यात काही भांडणांचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात तर असाच भांडणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यात असं दिसून येतंय की, दोन मुली अतिशय वाईट प्रकारे भांडत आहेत. तर काही मुली त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्या मुलींना त्या भांडणाऱ्या मुलींना थांबवण्यात यश काही मिळत नाहीये. या दोन्ही मुली अक्षरशः एकमेकींचे केस देखिल खेचत आहेत, या दोघी भांडता भांडता रस्त्यावर पडतात पण यांची भांडणे काही थांबत नाहीयेत. या दोघींमध्ये नक्की कशामुळे भांडणं झाली, याचं नक्की कारण तरी काय? हे अजून कळालं नाही. पण हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील नोएडातील आहे.
Kalesh b/w Two Groups of School Girls on Road, Noida Up
pic.twitter.com/qhqjAfRj9v— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 20, 2024
हेही वाचा : ऑरीनं 23 किलो वजन कसं कमी केलं? आहारातून काढून टाकले 'हे' पदार्थ
हा व्हायरल व्हिडीओ हा X यो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अर्थात आधीच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्या नेटकऱ्यानं कॅप्शन दिलं की 'शाळेतील दोन मुलींमध्ये बाचाबाची, नोएडा उत्तर प्रदेश.' हा व्हिडीओ 90 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर बऱ्याचं लोकांनी हास्यास्पद कमेंट्स देखील केल्या आहेत. एका नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'ही मारामारी करवाचौथसाठी तर नाही झाली?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मुली सद्धा मुलांपेक्षा कमी नाही.' तिसरा म्हणाला, 'कोणाच्या बॉयफेंडला कोणी चोरलं.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'कदाचित केसात हात अडकलाय असं वाटतयं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'या मुली नेहमी केस खेचतच का भांडतात?' अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुलींना ट्रोल केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या भांडणाचं नेमकं कारण काय असू शकतं असे प्रश्न उपस्थित केले आहेत.