रस्त्यावरच्या विक्रेत्याला काय मिळतेय एवढी सुरक्षा? नेमकं काय प्रकरण ...

रस्त्याने जात असताना जर तुम्हाला रस्त्याच्याकडेला एखाद्या विक्रेता कधी पोलीस सुरक्षेत दिसला तर

Updated: Jul 19, 2022, 02:25 PM IST
रस्त्यावरच्या विक्रेत्याला काय मिळतेय एवढी सुरक्षा? नेमकं काय प्रकरण ... title=

Trending News : बॉलीवूड अभिनेत्री आणि अभिनेत्यांसोबत आपण कायम बॉडीगार्ड असतात. तर पंतप्रधान, नेत्यांना आपण सुरक्षारक्षकांसोबत फिरताना पाहिलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, उत्तर प्रदेशात तर सुरक्षारक्षक घेऊन फिरणे स्टेटस सिम्बल मानलं जातं. पण रस्त्याने जात असताना जर तुम्हाला रस्त्याच्याकडेला एखाद्या विक्रेता कधी पोलीस सुरक्षेत दिसला तर. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. 

काय आहे नेमकी घटना?

जैथरा शहरातील रामेश्वर दयाल यांनी अखिलेश यादव यांच्या भावांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. सपा नेते रामेश्वर सिंह यादव आणि सपा नेते जुगेंद्र सिंह यादव यांच्याविरोधात रामेश्वर दयाल यांनी कोर्टाकडे दाद मागितली आहे. रामेश्वर सिंह यादव आणि जुगेंद्र सिंह यादव यांनी त्यांचा जमिनीचा मोबदला बळजबरीने हडपला आणि त्यांना जातीवरुन शिवीगाळ केली, असा आरोप रामेश्वर यादव यांनी केला आहे. तसंच यादवबंधूंनी 1 महिना आपल्याला बंधक बनवल्याचा आरोपही रामेश्वर यांनी केला आहे. रामेश्वर दयाल यांनी यासंदर्भात जैथरा पोलीस ठाण्यात 3 जूनला तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणावर हायकोर्टात सुनावणी सुरु आहेत. रामेश्वर दयाल यांचा जीवाला धोका असल्याने हायकोर्टाने त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. 

या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जुलैला होणार आहे. रामेश्वर दयाल यांना 24 तास नि:शुल्क सुरक्षा देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर एसएसपी एटा यांनी रामेश्वर दयाल यांना 2 तासांमध्ये सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. विशेष म्हणजे AK-47सह पोलीस कर्मचारी त्याचा सेवेत 24 तास असतात.