किती प्रकारचे असतात Saving Account? तुमच्यासाठी कोणते फायदेशीर वाचा

बहुतांश लोक बचत खाते वापरतात. परंतू तुम्हाला माहितीये का, की नक्की कोणत्या प्रकारचे बचत खाते तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.

Updated: Jan 18, 2022, 12:39 PM IST
किती प्रकारचे असतात Saving Account? तुमच्यासाठी कोणते फायदेशीर वाचा title=

मुंबई : बहुतांश लोक बचत खाते वापरतात. परंतू तुम्हाला माहितीये का, की नक्की कोणत्या प्रकारचे बचत खाते तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. कारण गरजेनुसार बचत खात्यांचेदेखील वेगवेगळे प्रकार असतात. नियमित व्यवहार करणाऱ्यांसाठी, जेष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी, लहान मुलांसाठी वेगवेगळे बचत खाते असतात. याप्रकारे एकूण मिळून 6 प्रकारचे बचत खाते असतात.

रेग्युलर सेविंग्स खाते
हे अकाउंट काही ठराविक अटींवर ओपन केले जाते. या प्रकाराचे अकाउंटमध्ये कोणतीही निश्चित रक्कम रेग्युलर भरायची नसते. त्याचा वापर सेफ हाऊससारखा असतो. जेथे तुम्ही फक्त पैसे सुरक्षित ठेवू शकता. यामध्ये काही खात्यांना किमान शिल्लक ठेवीची अट देखील असते.

सॅलरी सेविंग्स खाते
या प्रकारचे अकाउंट कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केले जाते. या प्रकारच्या खात्यासाठी व्याज ऑफर केले जाते. या खात्यांचा वापर कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी करण्यात येतो. याप्रकारच्या खात्यांसाठी कोणतेही मिनिमम बँलेंसची अट नसते. जर तीन महिन्यापर्यंत सॅलरी नाही आली तर, हे खाते रेग्युलर सेविंग्स अकाउंटमध्ये बदलते.

झीरो बँलेंस सेविंग्स खाते
या खात्यामध्ये सेविंग आणि करंट खात्यासारखे दोन्ही वैशिष्ट्ये असतात. परंतू रक्कम काढण्याची एक मर्यादा असते. त्यापेक्षा अधिक रक्कम तुम्ही काढू शकत नाही. 

माइनर्स सेविंग्स खाते
हे खाते लहान मुलांसाठी असते. यामध्ये मिनिमम बँलेंसची गरज नसते. हे खाते मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या स्कॉलरशिपच्या, बँकिंगच्या गरजा भागवण्यासाठी असते. हे खाते पालकांच्या देखरेखीखालीच सुरू करण्यात येते. बाळ वयाच्या दहाव्या वर्षानंतर हे खाते स्वतः हाताळू शकते. तसेच 18 वर्षानंतर हे खाते रेग्युलर सेविंग्स खात्यात बदलते.

सिनिअर सिटजंस सेविंग्स खाते
हे खाते रेग्युलर सेविग्स खात्यासारखे काम करते. परंतू रेग्युलर खात्यांपेक्षा जेष्ठ नागरिकांना जास्त व्याज उपलब्ध करून देते. या खात्यात पेंशन फंड किंवा रिटायरमेंटची रक्कम काढता येते. किंवा त्यासंबधी गरजा पूर्ण करता येतात.

महिलांसाठी सेविंग अकाउंट
हे खाते विशेषतः महिलांसाठी सुरू करण्यात येते. ज्यामध्ये महिलांना कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. डीमॅट खाते सुरू करण्यावरही कोणतेही शुल्क लागत नाही. अनेक प्रकारच्या खरेदीवरही सूट दिली जाते.