म्युझियमला महाराजांचे नाव दिल्याने उदयनराजेंनी मानले योगी आदित्यनाथ यांचे आभार

खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला फोन

Updated: Sep 18, 2020, 04:36 PM IST
म्युझियमला महाराजांचे नाव दिल्याने उदयनराजेंनी मानले योगी आदित्यनाथ यांचे आभार

मुंबई : खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मानले आभार आहेत. उत्तरप्रदेशमधील मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराज याचं नाव दिल्याबद्दल उदयनराजे यांनी फोन करुन योगींचे आभार मानले आहेत.

आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला होता. मुघल संग्रहालयाला योगी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे नाव दिले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबतची माहिती दिली होती.

योगी आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, 'आग्रामधील निर्माणाधीन संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखले जाईल. आपल्या नवीन उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेच्या चिन्हांना स्थान नाही. आमचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहे. जय हिंद जय भारत.'