उद्धव ठाकरे देणार शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांना धक्का

उद्धव ठाकरे यांनी काल खासदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खासदारांचं मत जाणून घेतलं.

Updated: Jul 12, 2022, 02:26 PM IST
उद्धव ठाकरे देणार शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांना धक्का title=

मुंबई : अखेर पक्षात मोठ्या बंडखोरीनंतर शिवसेना (Shivsena) आता नरमाईच्या भूमिकेत दिसत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या (NDA Candidate) उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देऊ शकते. याबाबतची औपचारिक घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. असे संकेत देत पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या निर्णयामागचे कारण सांगितले आहे.

संजय राऊत म्हणाले की, सोमवारी आम्ही शिवसेनेच्या बैठकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. मुर्मू यांना पाठिंबा दिल्याचा अर्थ आम्ही भाजपला पाठिंबा देत आहोत असा होत नाही. आदिवासी नेत्या म्हणून आपण द्रौपदी मुर्मू यांचे समर्थन करू शकतो. आम्ही यापूर्वीही असे निर्णय घेत आलो आहोत. शिवसेना कोणाला पाठिंबा देणार, हे एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील.

प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना दिला होता पाठिंबा

संजय राऊत पुढे म्हणाले की, विरोध टिकला पाहिजे. विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना ही आमची सदिच्छा आहे. यापूर्वी आम्ही राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्या एनडीएच्या उमेदवार नव्हत्या. प्रबन मुखर्जी यांनाही आम्ही पाठिंबा दिला. शिवसेना कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाही, असे राऊत म्हणाले.

पक्षाचे खासदार मुर्मू यांच्या बाजूने

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी मुर्मू यांच्या समर्थनार्थ मत व्यक्त केले. या बैठकीत संजय राऊत एकाकी पडल्याचे सांगण्यात येत असून त्यांनी शिवसेनेचे संयुक्त विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. पक्षाच्या बहुतांश खासदारांच्या मताशी सहमती दर्शवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करू शकतात, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे.