मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि अडवाणींना भेटले

 या भेटीत महाराष्ट्रासाठीचा निधी, जीएसटीची थकीत रक्कम, पंतप्रधान पीक विमा योजना

रामराजे शिंदे | Updated: Jan 28, 2022, 05:56 PM IST
मुख्यमंत्री ठाकरे दिल्लीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह आणि अडवाणींना भेटले title=

रामराजे शिंदे, झी २४ तास, नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या दौऱ्यात मॅरेथॉन भेटी घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींबरोबर सव्वा तास, सोनियांबरोबर चाळीस ते पन्नास मिनिटं, अमित शाह यांच्याबरोबर अर्था तास तर लालकृष्ण अडवाणी यांच्याबरोबर काही मिनिटं उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. 

राज्यात CAA आणि NPR लागू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. या भेटीत महाराष्ट्रासाठीचा निधी, जीएसटीची थकीत रक्कम, पंतप्रधान पीक विमा योजना यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. 

केंद्रात आणि राज्यात मतभेद नसल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्र हितासाठीच्या निर्णयांसाठी केंद्र मदत करेल, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.