महाराष्ट्र राज्याला केंद्राचं सहकार्य मिळण्याबाबत चर्चा - मुख्यमंत्री

पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद

Updated: Feb 21, 2020, 06:52 PM IST
महाराष्ट्र राज्याला केंद्राचं सहकार्य मिळण्याबाबत चर्चा - मुख्यमंत्री
फोटो सौजन्य : ANI

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये सव्वा तास चर्चा झाली. पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, आजपर्यंत मी दिल्लीत आलो होतो. पण मुख्यमंत्री झाल्यापासून पहिल्यांदा दिल्लीत आलो. पंतप्रधानांशी अनेक चांगल्या विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्र राज्याच्या ज्या आवश्यकता आहेत त्यावर चर्चा झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र राज्याला केंद्राचं सहकार्य लाभलं पाहिजे याबाबतही चर्चा झाल्याचं ते म्हणाले. सीएए, एनआरसी, जीएसटीबाबतही चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. सीएएबाबत घाबरण्याची गरज नाही. एनआरसीबाबत असलेली भीती चुकीची असल्याचंही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेणार आहेत.