नवी दिल्ली: मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आला. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आगामी आर्थिक वर्षासाठीच्या आर्थिक तरतुदींची माहिती सर्वांसमोर मांडली. यामुळे सामान्य जनतेच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या अनेक वस्तू आणि सेवांच्या दरात बदल झाले आहेत. परिणामी आजच्या अर्थसंकल्पामुळे कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या आणि कोणत्या गोष्टी महागल्या, यावर एक नजर टाकुयात.
या गोष्टी महागणार
तंबाखूजन्य पदार्थ
पेट्रोल-डिझेल
सोने-चांदी
परदेशातून आयात होणारी पुस्तके
डिजीटल कॅमेरा
काजू
मार्बल, टाईल्स
पीवीसी पाईप
गाड्यांचे सुटे भाग
सिंथेटीक रबर
ऑप्टीकल फायबर केबल
या गोष्टी स्वस्त होणार
इलेक्ट्रीक कार
विमा
घर खरेदी
चामड्याच्या वस्तू
लिथियम बॅटरी
सुरक्षा उपकरणे