नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम केले आहे. कल्याणकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आल्या आहेत. तसेच २७ कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर आले आहेत. महत्वाचे म्हणजे महागाईवर नियंत्रण ठेवण्यात आम्हाला यश आले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
FM Nirmala Sitharaman during her Budget speech: Efforts we have made in the last five years and the enthusiasm and energy of our youth are the ignition of our growth. #BudgetSession2020 pic.twitter.com/REvNUHLovI
— ANI (@ANI) February 1, 2020
एप्रिल २०२० पर्यंत जीएसटीचं नवे व्हर्जन येणार आहे, तशी घोषणा निर्मला सीतारामण यांनी आज केली. जीएसटी कर लागू करणे हे देशाच्या प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल होते. तसेच महागाई नियंत्रणात ठेवण्यात आम्हाला यश आले असेही त्या म्हणाल्या.
Finance Minister Nirmala Sitharaman: Three key points of Budget-aspirational India, economic development for all and that ours shall be a caring society. #Budget2020 pic.twitter.com/yuUZrthPE9
— ANI (@ANI) February 1, 2020
आपल्या देशातील बँकांची स्थिती सुधारली असून बँक व्यवस्था सुधारण्यात आम्हाला यश आले आहे. देशातील इन्स्पेक्टर राज संपवण्यात यश आले आहे. २७ कोटी लोक दारिद्र्यरेषेबाहेर आले असंही त्यांनी यावेळी सांगितले. ६० लाख नवे करदाते निर्माण झाले. आयुष्मान योजनेचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर झाला. अनेक योजनांमुळे ग्रामीण भागातल्या लोकांना लाभ झाला, असे निर्मला सीतारामण म्हणाल्यात.
दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण सकाळी ११ वाजता तो सादर करत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेची सध्याची मंदगती पाहता सरकार त्यात उत्साहाचे वातावरण आणण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी काय घोषणा करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, असे असले तरी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, या अर्थसंकल्पाचे शेअर बाजारावरही याचे पडसाद उमटण्याची शक्यता होती. त्याआधीच अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर बाजार सुरु होतानाच घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स १४० अंकांनी कोसळला असून निफ्टीची १२६.५० अंकांची घसरण झाली आहे.
बेरोजगारी, देशाची ढासळती अर्थव्यवस्था आणि मंदीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सकाळी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यानंतर त्या संसदेत पोहोचल्या. संसदेत कॅबिनेटच्या बैठकीत अर्थसंकल्पाला आधी मंजुरी देण्यात येईल. शुक्रवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला असून त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी समोर आली आहे.