Deltacron Variant | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Corona New Variant) देशवासियांच्या चिंतेत वाढ झाली. संपूर्ण देशात भितीचं आणि दहशतीचं वातावरण आहे.  

Updated: Mar 23, 2022, 11:18 PM IST
Deltacron Variant | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती title=

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Corona New Variant) देशवासियांच्या चिंतेत वाढ झाली. संपूर्ण देशात भितीचं आणि दहशतीचं वातावरण आहे. आरोग्य यंत्रणा (Health System) सतर्क झाल्या. या नव्या व्हेरिएंटबाबत केंद्रीय राज्यमंत्री भारत पवार (Bharti Pawar)  यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (union state minister for health and family welfare of india bharti pawar on deltacron)

भारती पवार काय म्हणाल्या?

"भारतात अद्याप डेल्टाक्रॉन हा कोरोनाचा खतरनाक वेरियंट आलेला नाही", अशी माहिती भारती पवार यांनी दिली. या भारती पवारांनी दिलेल्या या माहितीमुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

कोरोना निर्बंध हटवण्यात येणार

दरम्यान कोरोना नियमाबांबत सरकराने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत. केंद्र सरकार कोरोनाचे निर्बंध 31 मार्चपासून हटवण्यात येणार आहे. मात्र तरीही मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालणं करणं बंधनकारक राहणार आहे. केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना याबाबतचं पत्र पाठवलंय.