'कार-बाईक असणारे उपाशी नाहीत, पेट्रोल-डिझेलसाठी जास्त टॅक्स भरावाच लागेल'

केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोंज कन्ननाथनम यांनी पेट्रोल - डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवर भलतंच स्पष्टीकरण देऊन वाद ओढावून घेतलाय. 

Updated: Sep 16, 2017, 02:32 PM IST
'कार-बाईक असणारे उपाशी नाहीत, पेट्रोल-डिझेलसाठी जास्त टॅक्स भरावाच लागेल' title=

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोंज कन्ननाथनम यांनी पेट्रोल - डिझेलच्या वाढलेल्या किंमतींवर भलतंच स्पष्टीकरण देऊन वाद ओढावून घेतलाय. 

अल्फोंज यांच्या म्हणण्यानुसार, जे लोक पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करत आहेत ते उपाशी नाहीत... ते कार आणि बाईकचे मालक आहेत... आणि टॅक्स भरायची क्षमता आहे तर त्यांना पेट्रोल - डिझेलसाठी जास्त टॅक्स द्यावाच लागेल. 

गरिबांचं कल्याण करायचंय आणि त्यासाठी सरकार श्रीमंत लोकांकडून टॅक्स वसून करत आहे, असा विचित्र तर्क लावत त्यांनी चढ्या दरानं विकल्या जाणाऱ्या पेट्रोल - डिझेलचं आणि किंमतींचं समर्थनच केलंय. 

पेट्रोलियम पदार्थांच्या वाढलेल्या किंमती लक्षात घेता राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं लावलेल्या एक्साइज ड्युटीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरूनही भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव आकाशाला भिडलेले दिसून येत आहेत.