लखनऊ : उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारनं गुरुवारी ७ फेब्रुवारी रोजी आपला तिसरा अर्थसंकल्प मांडला. अर्थ मंत्री राजेश अग्रवाल यांनी एकूण ४ लाख ७९ हजार ७०१ कोटी १० लाख रुपयांचा (४,७९,७०१ लाख कोटी रुपये) अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढ करण्यात आलीय. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी योगी कॅबिनेटची बैठक पार पडली. यामध्ये अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. अर्थसंकल्पात २१ हजार २१२ कोटी ९५ लाखांच्या नव्या योजनांचा समावेश करण्यात आलाय.
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून योगी सरकारनं प्रत्येक वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न केलाय. अल्पसंख्यांक कल्याणासाटी या समुदायातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती योजनेसाठी ९४२ कोटींची तरतूद करण्यात आलीय. सोबतच अरबी फारसी मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी ४५९ कोटींची तरतूद योगी सरकारनं केलीय.
या अर्थसंकल्पामध्ये पूर्वांचल एक्सप्रेससाठी ११९४ कोटी, बुंदेलखंड एक्प्रेससाठी १००० कोटी, गोरखपूर लिंक एक्सप्रेससाठी १००० कोटी, डिफेन्स कॉरिडोरसाठी ५०० कोटी, आग्रा-लखनऊ एक्प्रेस वे ६-लेनसाठी १०० कोटी, स्मार्ट सिटी योजनेसाठी ७५८ कोटींची तरतूद करण्यात आलीय. तर स्वच्छ ग्रामीण मिशनसाठी ५८ हजार ७७० ग्राम पंचायतींना शौचमुक्त करण्यात आलंय.
- आरोग्यासाठी अर्थसंकल्पात आयुष्मा भारत नॅशनल हेल्थ प्रोजेक्ट मिशनसाठी १२९८ करोड रुपये
- पंतप्रधान मातृ वंदन योजनेसाठी २९१ करोड रुपये
- मुख्यमंत्री जन-आरोग्य योजनेसाठी १११ करोड रुपये
- राज्यात १०० बेडसहीत रुग्णालयांच्या स्थापनेसाठी ४७ करोड ५९ लाख रुपयांची तरतूद
- पायाभूत सोयी सुविधांसाठी ३०० करोड
- कानपूर मेट्रो रेल्वे परियोजनेसाठी आणि आग्रा मेट्रो रेल्वे परियोजनेसाठी १७५-१७५ करोड
- वाराणसी, मेरठ, गोरखपूर, प्रयागराज आणि झांसीच्या मेट्रो रेल्वे परियोजनेच्या प्रारंभिक कार्यासाठी १५० करोडची व्यवस्था करण्यात आलीय
- दिल्ली, गाझियाबाद, मेरठ कॉरिडोर, रीजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम परियोजनेसाठी ४०० करोड रुपये देण्यात आलेत
- प्राथमिक शिक्षणासाठी १८ हजार ४८५ करोडची व्यवस्था करण्यात आलीय
- ODOP साठी २५० करोड
- मुख्यमंत्री युवा स्वयंरोजगार योजनेसाठी १०० करोड
- ग्रामीक्ष क्षेत्रात गोशाळा निर्माणासाठी २४७ करोड ६० लाख रुपये
- शहरी क्षेत्रात गोशाळा तसंच पशु आश्रय योजनेसाठी २०० करोड रुपये
- दीनदयाल उपाध्याय डेअरी योजनेसाठी ६४ करोड १० हजार नवी केंद्र उभारणार
- मथुरा डेअरीसाठी ५६ करोड
- उत्तर प्रदेश दुग्ध नीतिसाठी ५ करोड रुपये
- दुग्ध संघ आणि समित्यांच्या पुर्नगठनासाठी ९३ करोड रुपये