देवरिया : उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी आज वादग्रस्त विधान केलेय. त्यामुळे योगी सरकारची डोकेदुखी वाढलेय. जो कोणी आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही, त्याला जेलची हवा खावी लागेल, असे वादग्रस्त विधान केलेय. शनिवारी दिव्यांग व्यक्तिंना साहित्याचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात ते आले होते.
त्यावेळी सांगितले सरकार शैक्षणिक साहित्यासाठी पैसा खर्च करत आहे. पुस्तक, बॅग, चप्पल, बुट, मोजे आणि जेवण आदी सर्व उपलब्ध करुन देत आहे. तसेच कायद्याप्रमाणे १४ वर्षीय मुल शाळेत गेले पाहिजे. जे कोणी आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही. त्यांना जेलमध्ये पाठविले जाईल.
याआधी ओमप्रकाश राजभर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. याआधी त्यांनी यादव आणि राजपूत हे सर्वाधिक जास्त दारु पितात, असे म्हटलेय. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आहे. या सरकारचा घटक पक्ष म्हणून सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आहे. २७ एप्रिल रोजी दारुबंदीच्या समर्थनसाठी मागणी करताना यादव आणि राजपूत जास्त दारु पितात, असे म्हटले. दारुमुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे. यावेळी मुलायम सिंग यादव यांच्यावर टीका केली.