मुंबई : या वर्षीप्रमाणेच पुढील वर्षही आयपीओच्या दृष्टीने सुपरहिट ठरू शकते. फेब्रुवारीपर्यंत 45 कंपन्या त्यांचे IPO आणू शकतात. यामध्ये स्टार्टअपचाही समावेश असेल.
LIC चा 2022 मध्ये सर्वात मोठा IPO असेल. तथापि, अद्याप त्याच्या IPO वर कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही. ते मार्चपूर्वी आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र आतापर्यंत त्याचे मूल्यांकन व इतर प्रक्रिया सुरू आहे.
यासोबतच ओला, बायजू, ओयो सारखे स्टार्टअप्सही बाजारात येण्याची तयारी करतील. LIC 80 हजार कोटींवरून एक लाख कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे.
delhivery ने या प्रकरणी सेबीकडे कागदपत्र सादर केले आहेत. या वर्षी देशात एकूण 79 युनिकॉर्न स्टार्टअप होते. स्टार्टअपच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकदार आणि नवीन उद्योजक येथे सतत युनिकॉर्न स्टार्टअप तयार करत आहेत.
हेदेखील वाचा - Tata Group चा हा स्टॉक तुफान परतावा देण्याच्या तयारीत; राधाकिशन दमानी यांनीही केली गुंतवणूक
या वर्षी बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणुक असलेल्या तीन कंपन्या बाजारात दाखल झाल्या होत्या. यामध्ये मेट्रो ब्रँड, नजरा आणि स्टार हेल्थ यांचा समावेश होता. नजरा वगळता दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांना नकारात्मक परतावा दिला.
गेल्या तीन महिन्यांत तीन डझनहून अधिक कंपन्यांनी सेबीकडे IPO आणण्यासाठी कागदपत्रे सादर केली आहेत. यामध्ये अदानी विल्मर, गो फर्स्ट एअरलाइन्स, ड्रूम टेक्नॉलॉजी, स्नॅपडील यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा - House Insurance | गृहविमा म्हणजे काय? चोरी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीची मिळणार भरपाई
अदानी विल्मर रु. 4500 कोटी तर गो फर्स्ट रु. 3500 कोटी उभारणार आहे. जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 63 कंपन्या बाजारात आल्या आहेत. या सर्वांनी मिळून बाजारातून 1.29 लाख कोटी रुपये उभे केले आहेत.
याआधी 2017 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक 75 हजार कोटी रुपये जमा झाले होते. पेटीएमने आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आणला होता. ज्याद्वारे 18,300 कोटी रुपये उभे केले. तर Zomato ने 9,375 कोटी रुपये उभे केले होते.
नुरेकाने उभारलेली सर्वात कमी रक्कम 100 कोटी रुपये होती. स्टार हेल्थने 7,249 कोटी रुपये उभे केले.