UPSC ची टॉपर असलेली टीना डाबीच्या लहान बहिणीचा देखील नागरी सेवा परीक्षेत डंका; रिया डाबीला 15 वी रॅंक

शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल लागला. 

Updated: Sep 25, 2021, 10:22 AM IST
UPSC ची टॉपर असलेली टीना डाबीच्या लहान बहिणीचा देखील नागरी सेवा परीक्षेत डंका; रिया डाबीला 15 वी रॅंक

नवी दिल्ली : शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल लागला. 2016 साली नागरी परीक्षेत 21 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशात पहिली येणारी टीना डाबीची लहान बहिण रिया डाबीने देखील यश संपादन केले आहे. देशात तिने 15 वी रॅंक मिळवली आहे. 

रिया नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तिची मोठी बहिण टीना डाबी (IAS)ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, माझी लहान बहिण रिया डाबीनेदेखील युपीएससी उत्तीर्ण केली आहे. तिला या परीक्षेत 15 वी रॅंक मिळाली आहे.  टीना डाबी सध्या राजस्थान केडरमध्ये संयुक्त सचिव वित्त(कर)पदावर कार्यरत आहे. 

रिया डाबीने देखील आपल्या बहिणीप्रमाणेच दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजची विद्यार्थीनी असून ती इंजिनिअर आहे. रिया दिल्ली येथे राहते. रिया BHEL मध्ये जॉब करते. तिचा वैकल्पिक विषय समाजशास्त्र होता. 

सिविल सेवा परीक्षेचे निकाल युपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर upsc.gov.in वर जारी करण्यात आले आहे. या मध्ये एकूण 761 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.  यावेळी शुभम कुमार पहिला, जागृती अवस्थी दुसरा, तरअंकिता जैन तिसऱ्या रँकने उत्तीर्ण झाली आहे.