क्वारंटाईनमध्ये राहिलेल्या मजुरांना उत्तर प्रदेश सरकार देणार १ हजार रुपये

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांमधून मजूर त्यांच्या स्वगृही उत्तर भारतात परतत आहेत. हे मजूर उत्तर भारतात परतत असल्यामुळे आता तिकडे कोरोना पसरण्याचा धोका आहे. कोरोनाचा हा धोका लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

Updated: May 21, 2020, 10:56 PM IST
क्वारंटाईनमध्ये राहिलेल्या मजुरांना उत्तर प्रदेश सरकार देणार १ हजार रुपये title=

लखनऊ : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांमधून मजूर त्यांच्या स्वगृही उत्तर भारतात परतत आहेत. हे मजूर उत्तर भारतात परतत असल्यामुळे आता तिकडे कोरोना पसरण्याचा धोका आहे. कोरोनाचा हा धोका लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये परतणाऱ्या प्रत्येक प्रवासी मजुराने त्याचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला तर त्याला १ हजार रुपये देण्यात येणार आहेत. या एक हजार रुपयांसोबतच मजुरांना जीवनावश्यक वस्तूही देण्यात येणार आहेत.