काळोखी रात्र आणि शुन्य डिग्री तापमान! निर्मनुष्य गावात 16 तास अडकले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

CEC Rajiv Kumar spends night in zero Temperature : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यंना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे आपातकालीन परिस्थितीत उतरवण्यात आलं. पण ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं ते ठिकाणी खूपच भयावह होतं.

राजीव कासले | Updated: Oct 17, 2024, 03:40 PM IST
काळोखी रात्र आणि शुन्य डिग्री तापमान! निर्मनुष्य गावात 16 तास अडकले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार title=

CEC Rajiv Kumar spends night in zero Temperature : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (CEC Rajiv Kumar) यांना एका भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. बुधवारी रात्री राजीव कुमार यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर (Helicopter) खराब हवामानामुळे तात्काळ जमिनीवर उतरवण्यात आलं. पण ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरलं ते ठिकाणी कूपच भयावह असल्याचं समोर आलं आहे. सीईसी राजीव कुमार यांचं हेलिकॉप्टर उत्तराखंडमधल्या (Uttarakhand) सुदूरवर्ती गावात उतरवण्यात आलं. निर्मनुष्य असलेल्या या गावतलं वातावरण शुन्य डिग्री इतकं होतं. याच परिस्थितीत सीईसी राजीव कुमार यांना तब्बल 16 तास काढावे लागले. सीईसी राजीव कुमार यांच्याबरोबर दोन पायलट, दोन निवडणूक अधिकारी हे देखील होते. या सर्वांना सुदूरवर्ती गावातील एका निर्जन घरात रात्र काढावी लागली.

मतदान केंद्राची पाहणी
सीईसी राजीव कुमार हे पिथौरगढ इथल्या एका मतदान केंद्राची पाहणी दौरा करणार होते. डोंगरावरच्या आणि अडगळीच्या ठिकाणी असलेल्या मतदान केंद्र आणि मतदारांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं, याची माहिती निवडणुक आयोगाला घ्यायची होती. यासाठी उत्तरांखडमधल्या 14 गावांतील मतदान केंद्राचा दौरा करण्याची योजना आखण्यात आली होती. पण खराब हवामानामुळे त्यांचं हेलिकॉप्टर रालम जवळ आपातकालीन परिस्थिती उतरवण्यात आलं. ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरलं त्या गावाचं नावं सुदूरवर्ती असं होतं. हे गाव उंच डोंगरावर असून इथलं तापमान शुन्य डिग्री सेल्सिअस इतकं असंत. गुरुवारी सकाळी सीईसी राजीव कुमार यांना सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं. हवामान चांगल्यानंतर हेलिकॉप्टरनीह उड्डाण घेतलं आणि मुनस्यारी तहसील मुख्यालयाच्या ठिकाणी पोहोचलं.

सुदूरवर्तीमध्ये काय घडलं?
सीईसी राजीव कुमार आणि इतर चार जण सुदूरवर्ती गावात तब्बल 16 तास अडकले होते. हे गाव पूर्णपणे बर्फाने आच्छादलेलं आहे. या गावात एकूण 28 घरं आहेत. पण सध्या या गावात एकही माणूस राहात नाही. बर्फवृष्टी आणि उंच डोंगरावर असल्यामुळे गावातील लोकं इतर ठिकाणी गेले आहेत. या गावात पोहचण्यासाठी दोन ते दिवसांचा प्रवास करावा लागतो. 

पिथौरगढचे जिल्हाधिकारी विनोद गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर मिलम हिमनद या ठिकाणी होतं, आणि खराब हवामानानुळे रात्री जवळपास एक वाजण्याच्या सुमारास उतरवण्यात आलं. त्यावेळी आकाशात काळे ढग दाटले होते, दृश्यता खूपच कमी झाली होती. त्यामुळे हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा दुर्गम ठिकाणी ईव्हीएम मशीन घेऊन जाताना निवडणूक कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं.