तामिळनाडूत शाळेत 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती लागू

यापुढे तामिळनाडूतल्या प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान दोन वेळा 'वंदे मातरम' म्हणणं सक्तीचं करण्यात आलंय. 

Updated: Jul 26, 2017, 09:03 AM IST
तामिळनाडूत शाळेत 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती लागू title=

चेन्नई : यापुढे तामिळनाडूतल्या प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान दोन वेळा 'वंदे मातरम' म्हणणं सक्तीचं करण्यात आलंय. 

मद्रास उच्च न्यायालयानं खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये हा नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत. 'वंदे मातरम' आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी गायलं जावं, असंही आदेशात म्हटलंय.

पण एखादी व्यक्ती हे गीत म्हणण्यात किंवा वाजवण्यास असमर्थ असेल, तर त्या व्यक्तीवर किंवा संस्थेवर गीत गाण्याची सक्ती मात्र करू नये, असं कोर्टाच्या आदेशात म्हटलंय. त्यासाठी व्यक्ती किंवा संस्थेला योग्य कारण मात्र द्यावं लागणार आहे. 

याशिवाय सरकारी आणि खासगी अस्थापानांमध्येही आठवड्यातून एकदा वंदे मातरम म्हटलं गेलं पाहिजे, असा कोर्टचा आदेश आहे. देशातला तरुण हे देशाचं भविष्य आहे... आणि कोर्टानं दिलेला हा आदेश जनता योग्य भावनेतून स्वीकारेल, कोर्टानं म्हटलंय.