Vayu cyclone live update: गुजरातमध्ये २ दिवस शाळा राहणार बंद

वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा

Updated: Jun 12, 2019, 06:34 PM IST
Vayu cyclone live update: गुजरातमध्ये २ दिवस शाळा राहणार बंद

मुंबई : वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 12 आणि 13 जून हे दोन दिवस धोक्याचे असून उत्तर रायगडात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. समुद्र खवळलेला राहणार असून 6 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मच्छिमार, पर्यटक, नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

- गुजरातमध्ये वायू चक्रियवादळामुळे २ दिवस शाळा राहणार बंद ठेवण्यात येणार आहे.

- वायू चक्रियवादळामुळे गुजरातच्या वेरावल येथून 280 किमी आणि पोरबंदर येथून 360 किमी दूर आहे. गुजरातमध्ये पोहोचल्यावर याचा गती 155-165 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे.

बांद्रा स्कायवॉकवरील छत पडून तिघेजण जखमी झाले आहेत. बांद्रा पश्चिम येथील सारस्वत बँकेसमोरील ही घटना आहे. तिघांना ही होली फॅमिली रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दुपारी दीड वाजता ही घटना घडली. जोरदार वादळामुळं स्कायवॉकवरील ही शीट कोसळली आहे.

- ठाणे आणि पालघर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पुढील ४ तासात पावसाची शक्यता.

- मुंबईत आतापर्यंत १४ झाडे कोसळली आहेत.

- जोरदार वादळाचा मुंबईत पहिला बळी गेला आहे. चर्चगेेटजवळ सिमेंटचा पत्रा डोक्यात पडून एकाचा मृत्यू झाला आहे. दुपारी पावणे दोन वाजताची ही घटना आहे. ६२ वर्षीय मधुकर नार्वेकर यांचा या दुर्घटनेत मृत्यू.

- वायू चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- चर्गगेट स्टेशन इमारतीवर असलेले जाहीरातीच्या होर्डिंग्जचे काही ब्लॉक पडले आहेत.