'ना राष्ट्रपती, ना उपराष्ट्रपती...मी तर उषाचा पती'

राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोदी सरकारकडून अजून कुणाचंही नाव अधिकृतरित्या पुढे आलेलं नाही... त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलंय. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत मोदी सरकारच्या काही वरिष्ठ मंत्र्यांच्या नावाचाही समावेश आहे. 

Updated: May 31, 2017, 01:36 PM IST
'ना राष्ट्रपती, ना उपराष्ट्रपती...मी तर उषाचा पती'

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोदी सरकारकडून अजून कुणाचंही नाव अधिकृतरित्या पुढे आलेलं नाही... त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलंय. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत मोदी सरकारच्या काही वरिष्ठ मंत्र्यांच्या नावाचाही समावेश आहे. 

मंगळवारी बोलताना नायडू यांनी मोठ्या सफाईनं आपण राष्ट्रपतीपदाच्या किंवा उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत दिलेत.    

पत्रकारांनी जेव्हा राष्ट्रपतीपदाबद्दल नायडूंना छेडलं तेव्हा त्यांनी मोठ्या शिताफीनं याला उत्तर दिलं. 'मला ना राष्ट्रपती बनायचंय आणि नाही उपराष्ट्रपती... मी तर ऊषाचा पती बनून खुश आहे' असं उत्तर नायडूंनी दिलं आणि एकच हशा पिकला. 

काही जणांनी राष्ट्रपतीपदासाठी व्यंकय्या नायडू यांच्या नावाची शक्यता वर्तवली होती.