Video : नाद करायचा नाही! मंदिरात चिमुकला हातात घेऊन आला साप आणि मग...

Viral Video : एक लहान मुला अचानक मंदिरात साप घेऊन येतो आणि त्यानंतर...  

Updated: Nov 23, 2022, 02:39 PM IST
Video : नाद करायचा नाही! मंदिरात चिमुकला हातात घेऊन आला साप आणि मग... title=
video boy playing with snake viral on social media nmp

Snake video : सापाला (Snake) पाहून भल्याभल्या माणसांना घाम फुटतो. सापाने दंश केल्यास आपला काही क्षणात मृत्यू होतो. साप हा विषारी प्राणी आहे त्यामुळे अनेकांना सापापासून भीती वाटते. सापाच्या नादाला सहसा कोणी जातं नाही. पण सोशल मीडियावर चिमुकल्याचा सापासोबतचा एक व्हिडीओ (video) तुफान व्हायरल (Viral) होतो आहे तो पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. 

नाद करायचा नाही!

सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होत असलेला व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा एका मंदिरातील (temple) धक्कादायक (Shocking video) दृश्यं आहे. एक चिमुकला मुलगा (boy) सापाला हातात पकडून मंदिरात येतो आणि मंदिरातील भाविक ओरडाओरड करुन इकडेतिकडे वळू लागतात. तुम्ही पाहू शकता महिला त्या मुलाना सापासोबत बाहेर काढण्यासाठी ओरडा ओरड करते. 

हेही वाचा - हॉस्पिटलच्या गार्डने चक्क भूतासाठी उघडलं दार, Video पाहून अंगावर येतो काटा

त्या इवश्या मुलाला सापाची किंचतही भीती वाटतं नाही. मात्र मंदिरातील मोठी मंडळी मात्र सापाला पाहून घाबरतात. मात्र हा लहान मुलगा सापासोबत बिनधास्त खेळताना (Child playing with snake) दिसतं आहे. एक महिला त्या चिमुकल्याचा व्हिडीओही काढताना दिसतं आहे. (video boy playing with snake viral on social media)

हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घालतं आहे. सापाला पाहून मंदिरातील लहान मुलं रडायला लागतं. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील कुठल्यातरी असल्याची शक्यता आहे.  या मुलाचे नातेवाईक हे सर्पमित्र असू शकतात कारण या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती त्या चिमुकल्याला साप कसा पकडायचा हे दाखवलं. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शुभम चव्हाण या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.