VIDEO : जेव्हा सीमेवरचा जवान कणखर आवाजात सुरेल गाणं गातो

'संदेसे आते है...' या गाण्याचा खरा अर्थ या जवानाच्या तोंडून गाणं ऐकताना जाणवतोय

Updated: Jan 15, 2019, 02:00 PM IST
VIDEO : जेव्हा सीमेवरचा जवान कणखर आवाजात सुरेल गाणं गातो title=

मुंबई : आज सेना दिनानिमित्त देशातील प्रत्येक नागरिक सीमेवर तैनात जवानांना सलाम करतोय. सोशल मीडियावर वेगवेगळे मॅसेजेसमधून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जातेय. यामध्येच एक व्हिडिओही व्हायरल होतोय... हा व्हिडिओ आहे सीमेवर लढणाऱ्या एक जवानाचा आणि त्याच्या कणखर आवाजातील सुरेल गाण्याचा... १९९७ साली आलेल्या जे पी दत्ता यांच्या 'बॉर्डर' या सिनेमातील एक गाणं बीएसएफचा हा जवान गातोय. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) कॅन्टीनमध्ये जवान या गाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. या जवानाचा आवाजच अनेकांना हा व्हिडिओ शेअर करण्यासाठी भाग पाडतोय.

केवळ २ मिनिटं ३ सेकंदाचा हा व्हिडिओ खरं तर मनाला स्पर्शून जातोय. 'संदेसे आते है...' हे सिनेमातील गाणं नेहमीसाठीच हीट ठरलंय. पण या गाण्याचा खरा अर्थ या जवानाच्या तोंडून गाणं ऐकताना जाणवतोय.

१९९७ साली आलेला 'बॉर्डर' हा सिनेमा भारत - पाकिस्तान युद्धावर आधारीत होता. या सिनेमात सनी देओल, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी असे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. बॉर्डर सिनेमातील 'संदेसे आते है' हे गाणं गायक सोनू निगमनं गायलं होतं, संगीत होतं अनू मलिक यांचं तर या गाण्याचे बोल लिहिले होते जावेद अख्तर यांनी...