Video : लिफ्टमध्ये लहान मुलांवर कुत्र्याचा हल्ला अन्...

Dog Attack Video :लिफ्टमध्ये महिला कुत्र्याला घेऊन शिरली अन्...पुढे काय झालं ते पाहून अंगावर काटा येतो. 

Updated: Nov 27, 2022, 11:28 AM IST
 Video : लिफ्टमध्ये लहान मुलांवर कुत्र्याचा हल्ला अन्... title=
video Delhi nodia dog attack on two children viral on Social media nmp

Noida Dog Attacks Children In Lift : कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये (Dog Attacks ) दिवसेंदिवस वाढ होतं आहे. लिफ्टमध्ये (Lift) पुन्हा एका पाळीव कुत्र्याने लहान मुलांवर हल्ल्याचा धक्कादायक व्हिडिओ (Shocking video) समोर आला आहे. दिल्लीजवळच्या नोएडा (Delhi Noida) भागात कुत्र्यानं दोन मुलांवर हल्ला चढवलाय. नोएडातील सेक्टर 168 मधील गोल्डन पाम सोसायटीमध्ये शनिवारी घडली आहे. 

काय घडलं नेमकं?

तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता, दोन लहान मुली लिफ्टमध्ये आहेत. त्या लिफ्टमध्ये अचानक एक महिला पाळीव कुत्र्याला बेल्ट लावून लिफ्टमध्ये येते. त्या दोन मुली कुत्र्याला पाहून घाबरतात आणि लिफ्टमध्ये बाजूला उभ्या राहतात. मात्र तो कुत्रा आक्रमक होतो आणि त्या दोन मुलींवर हल्ला करतो.

धक्कादायक व्हिडिओ 

ती महिला तातडीने लिफ्ट थांबवते आणि त्या मुलींची सुखरूप सुटका करते. (video Delhi nodia dog attack on two children viral on Social media)

पण, अशा घटना वारंवार घडताना दिसतायत... त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सोसायटीमध्ये श्वानप्रेमींसाठी स्वतंत्र लिफ्ट देण्यात यावी यावर नोएडा प्राधिकरण इमारतींमध्ये चर्चा सुरु आहे. यापूर्वीही लिफ्टमध्ये कुत्र्याने हल्ला केला आहे. त्यामुळे अनेक इमारतींमध्ये पाळीव कुत्र्यांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीही नागरिक करत आहे. जर तुम्ही Pet Puraan हा मराठी सिनेमा बघितला असेल तर या चित्रपटातही अशी घटना दाखविण्यात आली आहे.